बर्मिंगहॅम: कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने रविवारी पाकिस्तानचा एकतर्फी सामन्यात 8 गडी राखून पराभव ( Indian women team beat Pakistan by 8 wickets ) केला. या सामन्यामध्ये टीम इंडियाला फक्त 100 धावांचं टार्गेट मिळालं होतं. प्रत्युत्तरात स्मृती मंधानाच्या शानदार खेळीच्या जोरावर टीम इंडियानं ते सहज साध्य केले. स्मृतीने विजयी षटकार लगावत मॅच संपवली. राष्ट्रकुल क्रीडा 2022 मधील भारताने आपला पहिला विजय ( India first win in Commonwealth Games ) नोंदवला.
या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. जो त्यांच्यासाठी चुकीचा ठरला. तसेच पावसाच्या व्यत्ययामुळे सामना 18 षटकांचा करण्यात आला होता. त्यानंतर पाकिस्तानी संघ भारतीय गोलंदाजांसमोर पत्त्यासारखा कोसळला ( Pakistani team Batting collapsed ). पाकिस्तानने 18 षटकात सर्वबाद 99 धावा केल्या. पाकिस्तान संघाकडून सर्वाधिक धावा मुनीब अलीने केल्या. तिने 30 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकार लगावत 32 धावांचे योगदान दिले. भारताकडून गोलंदाजी करताना स्नेह राणा आणि राधा यादवने प्रत्येकी 2 बळी घेतले.