नवी दिल्ली :केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधीवर निशाणा साधला. लंडनमध्ये राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्य हे लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा, देशातील लोकशाही व्यवस्था, संसदीय परंपरा आणि मतदान करणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा अपमान असल्याचे सांगितले. राहुल गांधी यांनी संसदेतून पळून जाण्याऐवजी येऊन माफी मागावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केली. स्मृती इराणी म्हणाल्या की, निवडणुकीत विजय-पराजय हा राजकीय परंपरेचा भाग आहे, मात्र ज्या देशाचा इतिहास भारताला गुलाम बनवण्याचा राहिला आहे. त्या देशाला भेट देऊन राहुल गांधींनी परकीय शक्तींना भारतावर आक्रमण करण्याचे निमंत्रण दिले आहे.
स्मृती इराणी यांचे वक्तव्य : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुढे म्हणाल्या की, भारतातील लोकशाही व्यवस्था उद्ध्वस्त करताना राहुल गांधी यांनी खंत व्यक्त केली की, विदेशी शक्ती येऊन भारतावर हल्ला का करत नाहीत? राहुल गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दलचा द्वेष आता भारताच्या द्वेषात बदलला आहे, असा आरोप त्यांनी केला. राहुल गांधींना प्रश्न विचारत केंद्रीय मंत्री म्हणाल्या की, मला देशातील कोणत्याही विद्यापीठात बोलण्याचा अधिकार नाही, असे त्यांनी परदेशात म्हटले आहे. असे असेल तर 2016 मध्ये देशाची राजधानी दिल्लीतील एका विद्यापीठात (JNU) 'भारत तेरे टुकडे होंगे'चा नारा दिला जात होता, तेव्हा तिथे जाऊन त्यांनी काय समर्थन केले होते?