मुंबई -केंद्रीय मंत्री स्मृती इराणी ( Smriti Irani ) यांनी टपाल खात्यातून पैसे काढण्यासाठी एका वृद्ध महिलेला मदत ( Smriti Irani Helps Elder Woman ) केली आहे. मंगळवारी पोस्टाच्या अधिकाऱ्यांनी स्वत: त्या वृद्ध महिलेच्या घरी जाऊन पैसे महिलेच्या स्वाधीन केले. वाराणसीच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी ( Smriti Irani In Bhimnagar ) स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्यासाठी भीमनगरमध्ये पोहोचल्या होत्या. याची माहिती स्थानिक रहिवासी, वृद्ध महिला चिंता देवी यांना मिळाली. त्यांनी स्मृती इराणी यांना भेटण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा भाजपा नेत्यांनी चिंता देवी यांची भेट स्मृती इराणी यांच्याशी करून दिली. त्यावेळी त्यांनी स्मृती इराणी यांना त्यांच्या अडचणीविषयी सांगितले.
पतीने मुलीच्या लग्नासाठी पोस्ट ऑफिसमध्ये पैसे जमा केले होते. मात्र, पोस्ट ऑफिसमधील घोटाळ्यामुळे पैसे निघत नाहीत. त्याचबरोबर मुलगी सुमनच्या १५ जून रोजी होणार्या लग्नाबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. तसेच पैसे काढण्याची विनंती केली. यावर स्मृती इराणी यांनी प्रांतीय नगरसेवक दिनेश यादव यांना पोस्ट ऑफिस सुरू होताच चिंता देवींना तिथे घेऊन जा आणि पैसे काढण्यासाठी मदत करा आणि काही अडचण आल्यास त्या स्वत: पोस्ट ऑफिसमध्ये पोहोचतील, अशी सूचना केली.