महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Violence On Ram Navami : ममता बॅनर्जींनी दगडफेक करणाऱ्यांना क्लीन चिट दिली - स्मृती इराणी - ममता बॅनर्जी

हावडा येथे रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचारावरून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर जोरदार टीका केली आहे. ममता बॅनर्जी आरोपींच्या पाठीशी मुख्यमंत्री उभे असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

SMRITI IRANI
स्मृती इराणी

By

Published : Apr 1, 2023, 9:46 AM IST

नवी दिल्ली :पश्चिम बंगालमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीत झालेल्या हिंसाचारावरून राजकीय आरोप प्रत्यारोप तीव्र झाला आहे. आता यावरून केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ममता बॅनर्जींनी हिंसाचार करणाऱ्यांना क्लीन चिट दिल्याचा आरोप स्मृती इराणी यांनी केला आहे.

'ममता बॅनर्जी आरोपींच्या पाठीशी उभ्या' : स्मृती इराणी म्हणाल्या की, शुक्रवारी पश्चिम बंगालच्या हावडा येथे मिरवणुकीदरम्यान दगडफेक झाली. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्या प्रकरणी कारवाई करण्याऐवजी आरोपींना क्लीन चिट दिली. कायदा मोडणाऱ्या आरोपींच्या पाठीशी मुख्यमंत्री उभे असल्याचा आरोप केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी केला आहे. पश्चिम बंगालची सीआयडी सध्या या प्रकरणाचा तपास करत आहे. त्यांच्या बाजूने मात्र अद्याप कोणालाही क्लीन चिट मिळालेली नाही.

'हिंदू समाजावर हल्ला केला' :स्मती इराणी यांनी ममता बॅनर्जींवर हिंदू समाजावर हल्ला केल्याचा देखील आरोप केला आहे. त्यांनी ममतांना विचारले की, त्या किती दिवस असे करत राहणार आहेत. ममता बॅनर्जी यांच्या कार्यकाळात हिंदू समाजावर अनेक हल्ले झाले आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. स्मृती इराणी पुढे म्हणाल्या की, 'अशा प्रकारच्या हल्यांची ही काही पहिलीच वेळ नाही. 2022 मध्ये देखील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दलितांवर हल्ले झाले होते. त्यावेळीही मुख्यमंत्री काहीच बोलल्या नाहीत'.

सीआयडीकडे तपास सोपवला : हावडा येथे शुक्रवारी रामनवमीच्या मिरवणुकीत दोन समुदायांमध्ये हाणामारी झाली. हाणामारीत सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणाचा तपास पश्चिम बंगाल सरकारने सीआयडीकडे सोपवला आहे. सीआयडीचे पोलिस महानिरीक्षक सुनील चौधरी हे या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारीच पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांच्याशी चर्चा केली होती.

हे ही वाचा :Naxal Attack In Chaibasa : रामनवमीच्या मिरवणूकीचा फायदा घेत नक्षल्यांनी लुटली स्फोटके

ABOUT THE AUTHOR

...view details