महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Inspirational story : मानसिक आजारी मोलकरणीने पॅरालिम्पिकमध्ये पटकावली तीन कांस्यपदके

झारखंडमधील लातेहारच्या स्मिताने देखील असेच एक ध्येय साध्य केले आहे. अबुधाबी येथे झालेल्या स्पेशल पॅरालिम्पिकमध्ये स्मिताने तीन कांस्यपदके ( bronze medals in Paralympics ) जिंकून समाजाला एक धडा दिला की, कोणत्याही माणसाच्या उणिवा न बघता, त्याच्या गुणवत्तेकडे लक्ष देऊन त्यात सुधारणा करणे गरजेचे आहे. तसेच तिने तिच्या जून्या सर्व ओळख पुसून काढल्या आहे.

पॅरालिम्पिकमध्ये पटकावली तीन कांस्यपदके
पॅरालिम्पिकमध्ये पटकावली तीन कांस्यपदके

By

Published : Apr 26, 2022, 7:27 AM IST

झारखंड (लातेहार) - असे म्हणतात की जर ध्येय उंच असेल आणि त्यासोबत कौशल्य असेल तर माणसाला ते गाठण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. झारखंडमधील लातेहारच्या स्मिताने देखील असेच एक ध्येय साध्य केले आहे. अबुधाबी येथे झालेल्या स्पेशल पॅरालिम्पिकमध्ये स्मिताने तीन कांस्यपदके जिंकून ( bronze medals in Paralympics) समाजाला एक धडा दिला की, कोणत्याही माणसाच्या उणिवा न बघता, त्याच्या गुणवत्तेकडे लक्ष देऊन त्यात सुधारणा करणे गरजेचे आहे. तसेच तिने तिच्या जून्या सर्व ओळख पुसून काढल्या आहे.

मानसिक आजारी मोलकरणीने पॅरालिम्पिकमध्ये पटकावली तीन कांस्यपदके

मोलकरणीसाठी दिल्लीला पाठवले - खरे तर लातेहारच्या स्मिताची कहाणी फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या स्मिताचे बालपण खूप अडचणीत आणि तणावात गेले. स्मिताचा मानसिक विकास सामान्य मुलांपेक्षा खूपच कमी होता. अशा परिस्थितीत स्मिताचे संगोपन करणे तिच्या गरीब पालकांसाठी अडचणीचे बनले होते. दरम्यान, 2013 मध्ये स्मिताचे वडील कलेश्वर लोहरा यांनी स्मिताला गावातील काही लोकांसह घरगुती मोलकरीण म्हणून काम करण्यासाठी दिल्लीला पाठवले. स्मितालाही एका घरात मोलकरीण म्हणून ठेवले होते.

स्मिता

अचानक आयुष्याला कलाटणी मिळाली - एक दिवस स्मिता भाजी आणायला बाजारात गेली. ती कुठेतरी हरवली. स्मिताची मानसिक स्थिती अशी नव्हती की ती आपल्या घराची आणि पत्त्याची माहिती इतर कोणाला देऊ शकेल. अशा परिस्थितीत स्थानिक प्रशासनाच्या मदतीने स्मिताला आशा किरण नावाच्या संस्थेकडे सुपूर्द करण्यात आले. स्मिताची मानसिक स्थिती पाहता तिच्यावरही संस्थेने उपचार केले. दरम्यान, संस्थेच्या लोकांच्या लक्षात आले की स्मिता जड वजन सहजपणे उचलते. स्मिताचे कौशल्य वाढवण्याचे काम संस्थेने सुरू केले आणि तिला पॉवर लिफ्टिंगचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. जवळपास 6 वर्षांच्या मेहनतीमुळे आणि योग्य प्रशिक्षणामुळे स्मिताची अबुधाबी येथे होणाऱ्या विशेष पॅरालिम्पिकसाठी निवड झाली. 2019 मध्ये स्मिताने अबुधाबीला जाऊन देशाचे प्रतिनिधित्व केले आणि पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत तीन कांस्यपदके जिंकून देशाचा नावलौकिक मिळवला.

जिल्हाधिकाऱ्यांनी साधला संवाद - स्मिताच्या या यशानंतर तिचे घर आणि कुटुंब शोधण्याचे काम अधिक तीव्र झाले. दरम्यान, स्मिताची मानसिक स्थितीतही बरीच सुधारली होती आणि ती तिच्या घराबद्दल काहीतरी सांगू लागली. बालुमठचे नाव स्मिताने घेतले. माहिती मिळताच समाजकल्याण मंत्रालयाने लातेहारचे जिल्हाधिकारी अबू इम्रान यांच्याशी संपर्क साधून स्मिताच्या पालकांची विचारपूस केली. तपासादरम्यान असे आढळून आले की स्मिता ही लातेहारच्या बालुमठ ब्लॉकमधील हेमपूर या छोट्या गावातील रहिवासी आहे. यानंतर स्मिताच्या आई-वडिलांना दिल्लीला पाठवण्यात आले, तिथे संस्थेने स्मिताला तिच्या पालकांच्या ताब्यात दिले आणि ओळख बदलून ती गावी परतली.

जिल्हाधिकाऱ्यांनी साधला संवाद

प्रशासनाचे सहकार्य - स्वत:मध्ये परिवर्तन करून ती गावी परतली. स्मिताला लातेहार जिल्हा प्रशासनाने सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. उपायुक्त अबू इम्रान यांनी स्मिता आणि तिच्या कुटुंबीयांना आपल्या कार्यालयात बोलावून त्यांच्याशी बोलून त्यांचा सन्मान केला. जिल्हाधिकारी म्हणाले की, झारखंड सरकार खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. स्मिताला पुढे जाण्यासाठी पूर्ण वातावरण दिले जाईल. दुसरीकडे जिल्हा क्रीडा अधिकारी शिवेंद्र कुमार सिंग म्हणाले की, स्मिताने लातेहार जिल्ह्याचे तसेच संपूर्ण देशाचे नाव उंचावले आहे. स्मिताचा पाठपुरावा करण्यासाठी राज्य पॉवर लिफ्टिंग असोसिएशनशी बोलणे सुरू आहे.

प्रशासनाने कौतुक केले

कुटुंबीय आनंदी - 10 वर्षांपूर्वी कुटुंबापासून हरवलेल्या स्मिताच्या पुनरागमनामुळे आणि यशाने कुटुंबही खूप आनंदी आहे. स्मिताच्या काकांनी सांगितले की, प्रशासनाच्या पुढाकाराने त्यांनी दिल्लीला जाऊन स्मिताला घरी आणले आहे. स्मिताला पुढे नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली. स्मिता आणि तिची यशाची कहाणी लोकांसाठी प्रेरणादायी आहे. घरगुती मोलकरीण आणि मानसिक आजारी मुलगी म्हणून ओळखली जाणारी, स्मिता 10 वर्षांनंतर गावी परतली आणि एक यशस्वी खेळाडू बनली ज्याने देशाचे नाव कमावले. स्मिताचे चरित्र सांगते की आयुष्यात कधीही हार मानू नये. परिस्थिती कशीही असो, यशाचा मार्ग सापडतो. आता गरज आहे ती स्मिता तिच्या आयुष्यात कशी पुढे जाऊ शकते, यासाठी सरकारला पुढे यावे लागेल.

ABOUT THE AUTHOR

...view details