हैदराबाद : रेपो दरात वाढ (Increase repo rate) झाल्यामुळे कर्जाच्या व्याजदरात वाढ (Increase interest loans) झाली आहे. देशात महागाईचा दर सहा टक्क्यांच्या आसपास असल्याने दरवाढ अपेक्षित होती, मात्र, त्याचा बोजा सर्वसामान्यांवर नागरिकांवर पडला आहे. कर्जदारांनी त्यानुसार बचत आणि गुंतवणुकीच्या योजना आखून परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार असणे आवश्यक आहे. अनेक महिन्यांनंतर व्याजदरात काहीसा बदल बघायला मिळत आहे. मुदत ठेवीदारांसाठी हे वरदान असले तरी, कर्जदारांवर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती आणि इतर खर्च हे चिंताजनक बाब बनली आहे. त्यामुळे वित्तीय संस्था व्याजदर वाढवणार आहेत, ज्यामुळे ईएमआयमध्ये वाढ (Increase EMI) होईल. चलनवाढीला लगाम न घातल्यास आगामी काळात रेपो दरात आणखी वाढ होण्याचे संकेत दिसत आहेत.
खर्चावर अंकुश ठोवा:व्याजदर वाढीचा परिणाम ईएमआयवर (Impact EMI) होणार आहे. त्यामुळे, तुम्हाला तुमच्या मासिक कमाईचा एक हिस्साचा EMI भरण्यासाठी राखून ठेवावा लागणार आहे. तसेच तुम्ही तुमच्या अनावश्यक खर्चात कपात करण्याची गरज आहे. अनिवार्य खर्चाचे नियोजन करून तुम्ही ईएमआय भरण्यासाठी पैसे वाचवू शकता.
आंशिक परतावा :सहसा, बँका ईएमआय वाढवण्याऐवजी कर्जाचा कालावधी वाढवतात. त्यामुळे, तुमच्या मासिक बजेटवर त्याचा ताण पडत नाही. व्याजाचा कार्यकाळ वाढवल्याने व्याज प्रमाणानुसार वाढेल. जर तुम्ही चांगले नियोजन केले तर तुम्ही बँकांना ईएमआय वाढवण्यास सांगू शकता. तुम्ही व्याजाचा कार्यकाळ वाढवल्यास, तुमच्यावरील व्याजाचा भार कमी करण्यासाठी दरवर्षी अतिरिक्त EMI भरु शकता. असे केल्याने तुमच्यावरील कर्जाचा कमी करता येतो.
आता कर्जाची चिंता नको : जर ईएमआय तुमचा भरण्याच्या क्षमतेच्या पलीकडे जात असेल, तर तुम्ही बँकेला कर्जाची पुनर्रचना करण्यास सांगू शकता. मग बँक तुम्हाला एक नवीन आणि परवडणारा EMI पर्याय देईल. अन्यथा, तुम्हाला कमी व्याजदराने कर्ज देणारी बँक निवडावी (Choose low interest bank) लागेल. ज्यामुळे तुमच्यावरील कर्जाचा भार बराच कमी होईल.