अलीगड -प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात अलीगड मुस्लिम विद्यापीठात अल्ला हू अकबरचे नारे देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. कार्यक्रमाच्या समारोपाच्या वेळी एनसीसीच्या काही विद्यार्थ्यांनी नारा-ए-तकबीर, अल्ला हू अकबरच्या घोषणा दिल्या. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी विरोध सुरू केला. अलीगड पोलिसांनीही या घटनेची दखल घेतली आहे. त्याचबरोबर अलीगड मुस्लीम विद्यापीठाचे प्रशासन विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी कारवाई करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
खोडकर विद्यार्थ्याने केली घोषणाबाजी :अलीगड मुस्लिम विद्यापीठात राष्ट्रीय सण मोठ्या धुमधडाक्यात साजरे केले जात असल्याची माहिती विद्यापीठाचे प्रॉक्टर वसीम अली यांनी दिली. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये 100 वर्षात धार्मिक घोषणाबाजी कधीच समोर आली नाही. त्यामुळे एखाद्या खोडकर विद्यार्थ्याने अशी घोषणाबाजी केली असावी, असेही त्यांनी यावेळी सांगितेल. अलीगड मुस्लीम विद्यापीठाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. तपास केला जात आहे. तपासानंतर आवश्यक ती कारवाई केली जाईल असेही ते यावेळी म्हणाले.
गर्दीत अल्ला हू अकबरचा करण्यात आला जयघोष :गर्दीत अल्ला हू अकबरचा जयघोष करण्यात आल्याची माहिती प्रॉक्टर वसीम अली यांनी. नागरिक सभास्थळावरून निघून गेल्यावर ही घोषणाबाजी करण्यात आली. घोषणाबाजी करणाऱ्या विद्यार्थ्याची ओळख पटलेली नाही. व्हिडिओमध्ये एक विद्यार्थी घोषणाबाजी करताना दिसत आहे. लवकरच त्याची ओळख पटल्यानंतर कारवाई केली जाईल असेही ते यावेळी म्हणाले. अलीगड मुस्लीम विद्यापीठाचा एक व्हिडिओ सद्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एनसीसीचे विद्यार्थी अल्ला हू अकबरची घोषणाबाजी करताना दिसत आहेत. या संदर्भात विद्यापीठ प्रशासनाला आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या माहिती शहराचे पोलीस अधिक्षक कुलदीप गुणवत यांनी सांगितले.
अल्ला हु अकबरच्या घोषणांचा निषेध :अलीगड मुस्लीम विद्यापीठात अल्ला हु अकबरच्या घोषणा देण्यात आल्याने खळबळ उडाली. त्यामुळे या घटनेचा भाजप नेत्यांनी निषेध नोंदवला आहे. अभाविपचे योगेंद्र वर्मा यांनी व्हिडिओ ट्विट करून सीएमओ कार्यालय आणि पीएमओ कार्यालयाकडून कारवाईची मागणी केली आहे. भाजपचे माजी मीडिया प्रभारी निशीथ शर्मा यांनी अलिगढचे एसएसपी कलानिधी नैथानी आणि विद्यापीठ प्रशासनाकडे ट्विट करून कारवाईची मागणी केली आहे. विशेष म्हणजे अलीगडमधील एका सरकारी शाळेचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक मुस्लिम शिक्षक राष्ट्रगीत गाण्यास नकार देत आहे. शिक्षण विभाग या व्हिडिओचीही चौकशी करत आहे.
हेही वाचा - Actor Annu Kapoor Hospitalised :छातीत दुखू लागल्याने अभिनेता अन्नू कपूर दिल्लीतील रुग्णालयात दाखल