नवी दिल्ली - स्कायमेटने 2022 साठीचा ( Skymet weather forecast ) मान्सूनचा अंदाज जाहीर ( Skymet weather forecast ) केला आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार आगामी मान्सून हा सरासरीच्या 98 टक्के म्हणजे 'सामान्य' राहण्याची ( forecasts normal monsoon for India ) अपेक्षा आहे.
जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या कालावधीसाठी सरासरी 880.6 मिमी पावसाचा ( Skymet on monsoon 2022 ) अंदाज आहे. स्कायमेटने 2022 चा मान्सून 'सामान्य' राहिल असा ( prediction of Monsoon 2022 ) अंदाज व्यक्त केला आहे.
स्कायमेटचे सीईओ योगेश पाटील ( Skymet CEO on Monsoon ) म्हणाले, गेल्या दोन पावसाळ्यात ला निनाचा प्रभाव दिसून आला आहे. यापूर्वी, ला नीना हिवाळ्यात झपाट्याने कमी झाला होता. परंतु ट्रेन्ड वाईंडसच्या मजबूतीमुळे त्याचे कमी प्रमाण झाले आहे. पॅसिफिक महासागरातील ला नीना हा नैऋत्य मान्सूनच्या प्रारंभाच्या कमी होईपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे मान्सून खराब करणाऱ्या अल निनोची शक्यता नाकारता येत नाही. तथापि, मान्सूनच्या अस्थिर बदलामुळे मुसळधार पाऊस पडणे अपेक्षित आहे.