हैदराबाद - वय ६२. मधुमेहाने त्रस्त. मूत्रपिंडाचे कार्य सुधारण्यासाठी डायलिसिस करण्यात आले. यकृत प्रत्यारोपणही करण्यात आले. अशा परिस्थितीत एखाद्याच्या मनाची स्थिती काय असेल? मात्र अशातही आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम येथील पीव्ही रमणय्या (PV Ramanaiah from Visakhapatnam) यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील टेनिस स्पर्धांमध्ये भाग घेण्याचे ठरवले! त्यासाठी त्यांनी सराव आणि प्रशिक्षण घेतले व शारीरिक ताकद मिळवली. ते आता इंटरनॅशनल ट्रान्सप्लांट गेम्स फेडरेशन (WTGF)-2023 मध्ये आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज आहेत. ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे होणाऱ्या वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्समध्ये टेनिस खेळण्यासाठी निवड झालेले ते पहिला भारतीय खेळाडू आहेत. (Sixty year old athlete after liver transplant)
फुटबॉल खेळाडू होते - रमणय्या यांना लहानपणापासूनच खेळाची आवड होती. ते सिकंदराबाद रेल्वे झोनचे कर्मचारी म्हणून क्रीडा कोट्यात रुजू झाले आणि त्या विभागाच्या वतीने अनेक फुटबॉल स्पर्धांमध्ये भाग घेतला. नेपाळ येथे झालेल्या कनिष्ठ आशियाई युवा फुटबॉल स्पर्धेत त्यांनी देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र निवृत्तीनंतर रमणय्या यांना आजारपणाने पछाडले. 2017 मध्ये, डॉक्टरांनी त्यांचे हैदराबादच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये यकृत प्रत्यारोपण केले आणि त्यांना एकप्रकारे पुनर्जन्म दिला. किडनीचे कार्य सुधारण्यासाठी त्यांचे डायलिसिसही करण्यात आले. बरे झाल्यानंतर डॉक्टरांच्या सूचना आणि सल्ल्याने काही महिन्यांतच रामनय्या पुन्हा सक्रिय झाले. आणि पूर्वीप्रमाणे खेळात भाग घेऊ लागले.