महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Kerala Crime News : परप्रांतीय कामगारांमध्ये संघर्ष, केरळमध्ये सहा वर्षांच्या मुलाची चाकूने भोसकून हत्या

केरळच्या त्रिशूरमध्ये कामगारांमध्ये झालेल्या हाणामारीत एका आसामच्या बालकाचा दूर्देवी मृत्यू झाला. आरोपीला इतर कामगारांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

Crime
Crime

By

Published : Mar 31, 2023, 7:36 AM IST

त्रिशूर (केरळ) : स्थलांतरित कामगारांमध्ये झालेल्या भांडणात एका पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. मृतक नजीरुल इस्लाम हा मूळचा आसामचा रहिवासी आहे. या प्रकरणी आरोपी नातेवाईक जमाल हुसेनला लोकांनी पकडून वरंथापिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्रिशूर मुप्लियम मैदानाजवळ काल सकाळी ही घटना घडली.

मालमत्तेच्या वादातून खून : जमाल हुसेन हा मुलाच्या आईचा जवळचा नातेवाईक आहे. या दोघांमध्ये मालमत्तेवरून वाद झाला. या वादातून हा खून करण्यात आला आहे. जमाल हुसेनने नजीरुल इस्लामवर चाकूने वार केला, ज्यात त्याचा मृत्यू झाला. या हल्ल्यात मुलाची आई नजीमा कट्टू हिचा पाय कापला गेला. तर अन्य एक कामगारही जखमी झाला आहे. त्यांना त्रिशूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. आरोपी जमाल हुसेन याला इतर कामगारांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

दोन वर्षांच्या मुलीची गळा चिरून हत्या : दोन दिवसांपूर्वी राजस्थानच्या उदयपूरमध्ये एका पित्याने आपल्या दोन वर्षांच्या मुलीची गळा चिरून हत्या केली. उदयपूरच्या गोगुंडा भागात ही घटना घडली. हत्येनंतर आरोपी फरार झाला होता, ज्याला पोलिसांनी जवळच्या जंगलातून पकडले. हत्येनंतर आरोपीने मुलीचा मृतदेह कापडात गुंडाळून जवळच्या तलावात फेकून दिला होता. दुसऱ्या दिवशी तलावात तिचा मृतदेह आढळल्याने ही धक्कादायक घटका उघडकीस आली. मृतदेह मिळाल्यानंतर रहिवाशांनी पोलिसांना माहिती दिली. कौटुंबिक कलहातून हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

12 वर्षाच्या मुलाची दोरीने आवळून हत्या : बिहारच्या गोपालगंजमध्येही नुकतीच अशा प्रकरारच्या हत्येची घटना समोर आली आहे. येथे एका पित्याने आपल्या 12 वर्षाच्या मुलाची गळ्याला दोरीने आवळून हत्या केली. गोपालगंजमधील एकडेरवा गावात ही घटना घडली. हत्येनंतर आई आणि वडिलांनी मुलाचा मृतदेह जवळच्या तलावात फेकला होता. स्थानिकांनी सुरुवातीला बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज लावला, परंतु शरीरावरील जखमांमुळे ही हत्या असल्याचे स्पष्ट झाले. यावरून पोलिसांनी पालकांना पकडले.

हेही वाचा :Pune Crime: हडपसरमध्ये गॅंगवॉर टोकाला; मर्डरचा रिप्लाय मर्डरचं म्हणत आरोपीवर कोयत्याने वार

ABOUT THE AUTHOR

...view details