वैशाली (बिहार): संशयित तरुणांवर हल्ला वैशालीमध्ये (Basha Bail) नंदी बैलासह भिक्षू म्हणून फिरणाऱ्या इतर धर्माच्या लोकांना बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर ( Suspected Youths Assaulted In Vaishali) आला आहे. दोन दिवसांपूर्वी बजरंग दलाच्या (Bajrang Dal) सदस्यांनी आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. सर्व संशयास्पद अवस्थेत बैलासह परिसरात फिरत होते, असे सांगण्यात येत आहे.
नंदी बैलासोबत साधू बनून फिरणाऱ्या तरुणांना मारहाण - व्हायरल व्हिडिओमध्ये शोले चित्रपटातील गब्बर सिंगसारखा वाटणारा तरुण सहा तरुणांना कशी बेदम मारहाण करत आहे, हे स्पष्टपणे दिसत आहे. फिल्मी स्टाईलमध्ये झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये सहा तरुण जमिनीवर पडून राहून सोडून देण्याची भीक मागत असल्याचे दिसत आहे. त्याचवेळी एक व्यक्ती हातात काठी घेऊन फिरत असून त्यांना मारत आहे.
जुना व्हिडीओ झाला व्हायरल : व्हायरल व्हिडीओ दोन दिवस जुना असल्याचं बोललं जात आहे. मात्र तो आता व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये सर्व संशयितांना मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष आर्यन सिंह असल्याचे समजते. ही गोष्ट २४ जुलैची आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कोठडीत घेण्यापूर्वी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कदम घाट येथे सर्वांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्वांना ताब्यात घेतले.
मोठ्या कटाचा संशय : सर्वांची वैद्यकीय तपासणी करून पोलिसांनी नाव आणि पत्त्याची पडताळणी करून नंतर बाँड भरून सर्वांना सोडले. मात्र, हे सर्व स्लीपर सेल असल्याचा आरोप बजरंग दलाच्या जिल्हाध्यक्षांनी केला आहे. ते साधूचा वेश धारण करून हिंदूंच्या भावनांशी खेळ करून दहशतवादी घटना घडवून आणण्याचा प्रयत्न करत होते, असा त्यांचा आरोप आहे.