झुंझनू (राजस्थान) -राजस्थानातील झुंझनू जिल्ह्यातील खेतडी तालुक्यात चिरानी गावात एकाच मंडपात सहा सख्ख्या बहिणींनी लग्नगाठ ( Six Sisters Marriage in Same Tent ) बांधल्याची घटना समोर आली आहे. स्कुलबस चालक पित्याने एकाच दिवशी एकाच वेळी सहा सख्ख्या बहिणींची लग्नगाठ बांधल्याची अनोखी घटना ( Unique Marriage ) समोर आली आहे. पित्याने अत्यंत सन्मानपूर्वक पद्धतीने आपल्या मुलींना सासरी पाठवले आहे.
सहाही मुलींनी घेतले एकत्र फेरे -
आतापर्यंत तुम्ही दोन, तीन बहिणींची एकत्र लग्न पाहिली किंवा ऐकली आहे. परंतु झुंझुनू जिल्ह्यातील खेतडीजवळील चिरानी गावात सहा बहिणींचे एकत्र लावलेले लग्न हा चर्चेचा विषय ठरला आहे. सात मुलींपैकी सहा मुलींचे एकत्र लग्न केली आहेत. सहाही मुलींनी एकत्र फेरे घेतल्यानंतर त्यांनी एकत्र घोड्यांवर बसवून त्यांची वरात देखील काढली.