बेळगाव - मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या अंगावर ॲसिड शाई फेकण्यात आली. तसेच त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपही त्यांनी केला आहे. (Deepak Dalvi) या घटनेनंतर टिळकवाडी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दीपक दळवी यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. (Maharashtra Ekikaran Samiti Stand) अशोक दड्डी व संतोषकुमार देसाई यांच्यासह अन्य सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल (दि. 13 डिसेंबर)रोजी बेळगाव येथे महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा सुरू होता. यावेळी हा शाईफेकण्याचा प्रकार घडला.
समितीकडून बेळगाव बंदची हाक
गेल्या अनेक वर्षांपासून सीमाभागातील मराठी भाषीक आपल्या न्याय हक्कांसाठी लढा देत आहेत. लोकशाहीच्या मार्गाने आजपर्यंत लढत आले आहेत. मात्र, वारंवार कन्नड सरकारकडून त्यांच्यावर अन्याय होत आला आहे. दरवर्षी येथील बेळगावमध्ये कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन होत असते. याच अधिवेशनावेळी मराठी भाषिकही 2006 सालापासून समांतर असा मेळावा घेत असतात. याच मेळाव्या दरम्यान, एका कन्नड रक्षक वेदिकेच्या काही कार्यकर्त्यांनी एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर शाई फेकली. या संतापजनक घटनेचा सर्वच स्थरातून निषेध व्यक्त केला जात असून आज बेळगावसह सीमाभागात बंदची सुद्धा हाक देण्यात आली आहे.