एका धक्कादायक घटनेत बुधवारी जम्मू शहरातील सिध्रा भागात निवासी घरात किमान सहा अर्धकुजलेले मृतदेह six semi decomposed bodies found सापडले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सांगितले की, सिध्रा येथील तवी विहार परिसरातील दोन निवासी घरांमध्ये मृतदेह सापडले आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली जाण्याची शक्यता SIT Will Be Established आहे.
पोलिसांचे पथकघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, प्राथमिक तपासात हे सर्व लोक काश्मीरचे असल्याचे स्पष्ट झाले असून त्यांच्या कुटुंबियांनाही माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, जीएमसी जम्मूच्या वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले की, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतर कळेल.