महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Six People Murdered in Deoria : उत्तर प्रदेश हादरलं! जुन्या वादातून माजी जिल्हा परिषद सदस्यासह 6 जणांची हत्या - जुन्या वादातून सहा जणांची निर्घृण हत्या

Six People Murdered in Deoria : उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात एकाच कुटुंबातील पाच जणांसह सहा जणांची हत्या करण्यात आलीय. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आहेत.

Six People Murdered in Deoria
Six People Murdered in Deoria

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 2, 2023, 12:20 PM IST

जुन्या वादातून माजी जिल्हा पंचायत सदस्यासह 6 जणांची हत्या

देवरिया (उत्तर प्रदेश) Six People Murdered in Deoria : उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील रुद्रपूरजवळील फतेहपूर गावात जुन्या वादातून सहा जणांची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडलीय. यासंदर्भात माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतलीय. या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. सध्या गावात तणावाचं वातावरण आहे. एकाचवेळी झालेल्या सहा जणांच्या हत्येनं पोलीस विभागातही खळबळ उडालीय.

जमिनीच्या वादातून हत्या : रुद्रपूर परिसरातील फतेहपूर ग्रामपंचायतीच्या लेधान टोला येथील सत्य प्रकाश दुबे यांचे कुटुंब आणि गावातील अभयपुरा टोला येथील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रेमचंद यादव यांच्या कुटुंबात जमिनीवरून वाद सुरू होता. माजी जिल्हा पंचायत सदस्य प्रेम यादव यांची सोमवारी सकाळी हत्या करण्यात आली. या घटनेमुळं संतप्त झालेल्या जमावानं आरोपी सत्यप्रकाश दुबे याच्या घरापर्यंत पोहोचले. यानंतर संतप्त जमावानं दोन मुलं, एक महिला, अन्य एकाची हत्या केली. या घटनेनंतर गावात तणावाचं वातावरण असून पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

आतापर्यंत दोघांना अटक : डीजीपी मुख्यालयाच्या म्हणण्यानुसार, प्रथमदर्शनी ही घटना जुन्या वादातून घडल्याचं दिसतंय. सोमवारी सकाळी प्रेम यादव हे सत्यप्रकाश दुबे यांच्या घरी पोहोचले होते. त्यावरून बाचाबाची झाली आणि सत्यप्रकाश दुबे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी प्रेम यादव यांची धारदार शस्त्राने हत्या केली. यानंतर काही वेळानं अभयपूर येथील प्रेम यादव वस्तीतील लोकांनी सत्यप्रकाश दुबे यांच्या घरावर हल्ला करून हा गुन्हा केला. याप्रकरणी आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलीसांनी सांगितलंय.

पोलिसांचा मोठा बंदोबस्त : या घटनेची माहिती मिळताच एसपी संकल्प शर्मा यांनी आसपासच्या पोलीस ठाण्याच्या पोलीसांना घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले. देवरियाचे जिल्हाधिकारी अखंड प्रताप सिंहही घटनास्थळी पोहोचले आहेत. गावाव्यतिरिक्त शवविच्छेदन गृह आणि देवरा बाबा महर्षी वैद्यकीय महाविद्यालय येथेही मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. एका मुलीसह तिघांवर उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. यातील आरोपींना पकडण्यासाठी छापे टाकण्यात येत असल्याचं देवरियाचे एसपी संकल्प शर्मा यांनी सांगितलंय.

हेही वाचा :

  1. Suspected Ghost : अघोरी प्रकार! भूत असल्याच्या संशयातून महिलेला मारहाण, स्मशानातील राख लावली खायला, गुन्हा दाखल
  2. Amravati Crime: अमरावती हादरलं! सासू आणि मेहुण्याची जाळून हत्या केल्यावर जावयाची आत्महत्या
  3. Doctor Murder In UP : जमीनाच्या वादातून डॉक्टरचा खून, मारेकऱ्यांनी केला प्राणघातक हल्ला

ABOUT THE AUTHOR

...view details