लखनौ - उत्तरप्रदेशातील जौनपूर जिल्ह्यात ट्रक आणि पिकअपच्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. जलालपूर पोलीस ठाणे क्षेत्रातील त्रिलोचन बाजाराजवळ ही घटना घडली. पिकअपमधील सर्वजण वाराणसीवरून अंत्यविधी उरकून माघारी येत होते. मात्र, भल्या पहाटे त्यांच्यावर काळाने घाला घातला.
उत्तरप्रदेश : अंत्यविधीहून परत येताना काळाचा घाला, सहा जणांचा मृत्यू - उत्तरप्रदेश रस्ते अपघात
उत्तरप्रदेशातील जौनपूर जिल्ह्यात ट्रक आणि पिकअपच्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. जलालपूर पोलीस ठाणे क्षेत्रातील त्रिलोचन बाजाराजवळ ही घटना घडली.
![उत्तरप्रदेश : अंत्यविधीहून परत येताना काळाचा घाला, सहा जणांचा मृत्यू अपघात](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10552597-711-10552597-1612838073795.jpg)
अपघात
पोलीस घटनेची माहिती देताना
ही धडक इतकी भीषण होती की, जागेवरच पाच जणांचा मृत्यू झाला. तर एका व्यक्तीचा गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. सर्व मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.