महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मोठी कारवाई.. भाजप नेत्याच्या कुंटणखान्यातून 6 मुलांची सुटका, 73 जणांना अटक - conrad k sangma

मेघालयातील तुरा येथे भाजपच्या उपाध्यक्षाकडून कथितपणे चालवल्या जाणाऱ्या कुंटणखान्यातून ( brothel allegedly run by BJP Meghalaya vice president ) सहा मुलांची सुटका करण्यात आली ( Six children rescued from brothel ) आहे. तसेच 73 जणांना अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर या मुलांना पोलिसांनी बाल संरक्षण अधिकाऱ्याच्या ताब्यात दिले आहे.

brothel allegedly run by BJP Meghalaya vice-president Bernard N Marak in Tura
भाजप नेत्याच्या कुंटणखान्यातून 6 मुलांची सुटका, 73 जणांना अटक

By

Published : Jul 23, 2022, 10:36 PM IST

शिलाँग : मेघालयातील तुरा येथे भाजपचे उपाध्यक्ष बर्नार्ड एन मारक याच्याकडून चालवल्या जाणाऱ्या कुंटणखान्याचा ( brothel allegedly run by BJP Meghalaya vice president ) भंडाफोड करण्यात आला आहे. पोलिसांनी कुंटणखान्यातून सहा मुलांची सुटका करून ( Six children rescued from brothel ) 73 जणांना अटक केली आहे.

या संदर्भात वेस्ट गारो हिल्सचे जिल्हा पोलीस अधीक्षक विवेकानंद सिंग यांनी सांगितले की, एका गुप्त माहितीच्या आधारे, रिम्पू बागान या मराक यांच्या मालकीच्या फार्महाऊसवर छापा टाकण्यात आला. यावेळी आम्ही सहा अल्पवयीन मुलांपैकी चार मुले आणि दोन मुलींची सुटका केली आहे. हे सर्व बर्नार्ड एन मारक आणि त्याच्या सहकाऱ्यांकडून वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने कुंटणखाना म्हणून चालवल्या जाणार्‍या रिनपू बागानमधील गलिच्छ खोल्यांमध्ये बंद सापडले होते.

ट्विट

ते म्हणाले की, सर्व मुलांना ताब्यात घेण्यासाठी आणि कायद्यानुसार आवश्यक कारवाई करण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी (DCPO) यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. अधिकार्‍याने सांगितले की, 73 लोकांना चुकीच्या कामात गुंतल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. फार्महाऊसमध्ये 30 लहान खोल्या असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, ही तीच जागा आहे जिथे एका मुलीवर लैंगिक अत्याचार झाला होता आणि या संदर्भात फेब्रुवारी 2022 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा :जळगावात उच्चभ्रू वस्तीत चालणारा कुंटणखाना उद्ध्वस्त; 6 महिलांसह 3 आंबटशौकिन ताब्यात

ABOUT THE AUTHOR

...view details