सिंगरौली ( मध्यप्रदेश ): Singrauli Neem Tree Milk: जिल्ह्यातील निगाही येथील कडुलिंबाच्या झाडातून शनिवारी सकाळी अचानक दुधाचा पदार्थ बाहेर पडू लागला. लोकांनी शीतला मातेचा चमत्कार म्हणून पूजा करण्यास सुरुवात केली. हे पाहून शेकडोचा जमाव येथे जमा झाला. प्रत्येकजण याला शीतला मातेचा चमत्कार मानत आहे. अनेकजण हा दुधाचा पदार्थ भांड्यात भरून घेत आहेत. हे प्रत्येक आजारावर औषध असल्याचेही सांगितले जात आहे. Singrauli Sheetla Mata Chamatkar
Singrauli Neem Tree Milk: चमत्कार की अंधश्रद्धा! झाडातून निघत आहे दुधाची धारा.. देवाचा प्रसाद म्हणून पिताहेत लोकं - सिंगरौली कडुनिंबाच्या झाडातून निघतेय दूध
Singrauli Neem Tree Milk: कडुलिंबाच्या झाडातून अचानक दूध बाहेर पडल्याची विचित्र घटना समोर आली आहे. हे विचित्र दृश्य पाहिल्यानंतर काही लोक याला निसर्गाचा करिष्मा मानून श्रद्धेशी जोडत असल्याचंही बोलू लागले आहेत. मात्र, हे दृश्य पाहण्यासाठी लोकांची गर्दी होते आहे. Singrauli Sheetla Mata Chamatkar

झाडाची पूजा सुरू : चमत्कार म्हणा की अंधश्रद्धा! ही बातमी लोकांपर्यंत पोहोचताच पूजेसाठी दूरदूरवरून लोकं पोहोचू लागले आहेत. मात्र सिंगरौली जिल्ह्यातील निगाही परिसरात कडुलिंबाच्या झाडातून ज्या प्रकारे दूध बाहेर येत आहे ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. लोक याला दैवी चमत्कार मानून श्रद्धेशी जोडत आहेत. झाडाच्या माथ्यावरून बाहेर पडून खोडाच्या साहाय्याने हा पदार्थ मोठ्या प्रमाणात जमिनीवर जमा होत आहे. याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. लोक श्रद्धेने ते पाहू लागले आणि झाडातून बाहेर पडणाऱ्या पदार्थाला दूध समजून पूजा करू लागले.
याआधीही घडले चमत्कार : स्थानिक लोकांच्या मते या झाडाची अनेक वर्षांपासून पूजा केली जात आहे. झाडातून निघणारे दूध हा सीतामातेचा प्रसाद आणि चमत्कार आहे. हे सर्व रोग बरे करते, असे लोकं सांगत आहेत. दूरदूरवरून लोक नारळ व पूजेचे साहित्य घेऊन पायी चालत जात आहेत. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार या झाडाखाली यापूर्वीही असे अनेक चमत्कार घडले आहेत. यामुळे लोकांना समजू लागले आहे की, हा शीतला मातेचा चमत्कार आहे.