चेन्नई (तामिळनाडू): तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री ईपीएस म्हणजे इ पलानीस्वामी यांनी एआयएडीएमकेमधील वर्चस्वाच्या लढाईत त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या ओपीएस म्हणजे ओ पन्नीरसेल्वम यांना मागे टाकत विजय मिळवला आहे. सुप्रीम कोर्टाने पक्षाचे अंतरिम सरचिटणीस म्हणून EPS यांची झालेली निवड कायम ठेवल्यामुळे, एआयएडीएमके पक्षात आता पुन्हा एकल नेतृत्वाची सुरुवात झाली आहे. पक्षाच्या नेतृत्वासाठी झालेल्या लढाईत ईपीएस यांची पुन्हा निवड झाल्याने त्यांचे प्रतिस्पर्धी ओपीएस यांना मिळालेला हा मोठा धोका आणि त्यांनी खेळलेला एक मोठा राजकीय जुगार होता. आता ईपीएस हे पक्षात पहिल्या क्रमांकाचे नेते झाले आहेत.
ओपीएस यांची हकालपट्टीच:गेल्यावर्षी 11 जुलैच्या शेवटच्या सर्वसाधारण सभेला आव्हान देणारी ओपीएस आणि त्यांच्या आणखी एका समर्थकाने केलेली याचिका फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने त्यांची पक्षातून झालेल्या हकालपट्टीवर एकप्रकारे शिक्कामोर्तबच केले. जयललिता यांना अण्णाद्रमुकचे कायमस्वरूपी सरचिटणीसपद रद्द करणारी जनरल कौन्सिल आणि इतर ठरावही न्यायालयाने कायम ठेवले आहेत.
ओपीएस यांना न्यायालयाने फटकारले:EPS यांना पक्षाच्या बहुसंख्य पक्ष कार्यकर्ता आणि आमदारांचा पाठिंबा लाभला असताना, OPS यांनी त्यांच्यासमोर काही लोकांना उभे करून कायदेशीर आव्हान उभे केले होते. सध्याचा निकाल मद्रास उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर देण्यात आला आहे. त्या निकालानुसार पक्षाच्या मंचावर समर्थन सिद्ध न करता राजकीय स्कोअर सेट करण्यासाठी न्यायपालिकेचा वापर केल्याबद्दल ओपीएसला फटकारण्यात आले आहे.