वाराणसी :भोजपुरी चित्रपट अभिनेत्री आकांक्षा दुबे हिच्या मृत्यूप्रकरणी भोजपुरी गायक समर सिंह पोलीस कोठडीत आहे. आरोपी समर सिंहच्या चौकशीच्या तिसऱ्या दिवशी त्याने बँक खात्यांशी संबंधित तपशील पोलिसांना दाखवला. समर सिंह आणि त्याचा भाऊ संजय सिंह यांच्या एकूण 8 बँक खात्यांचा तपशील पोलिसांच्या हाती लागला आहे. याशिवाय आकांक्षा दुबेच्या 2 बँक खात्यांचा तपशीलही पोलिसांना मिळाला आहे. पोलिसांना एकूण 10 बँक खात्यांची चौकशी करायची आहे.
समर सिंह 5 दिवसांच्या पोलीस कोठडीत :आकांक्षा दुबे मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आलेला भोजपुरी गायक समर सिंह 5 दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे. पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक समर सिंहची सतत चौकशी करत आहेत, तर त्याचा भाऊ संजय सिंह हाही अटक झाल्यानंतर वाराणसी जिल्हा कारागृहात बंद आहे. चौकशीच्या तिसऱ्या दिवशी समर सिंहने पोलिसांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तरे दिली आहेत. पोलिसांनी समर सिंगला आतापर्यंत 55 प्रश्न विचारले आहेत. ज्यामध्ये बहुतांश प्रश्न समर सिंह आणि आकांक्षा दुबे यांच्याशी संबंधित आहेत.
समर सिंह वारंवार आपण निर्दोष असल्याचे सांगत आहे : विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना समर सिंहने त्याची आणि आकांक्षाची भेट, एकत्र राहणे, काम करणे आणि कौटुंबिक परिस्थिती तसेच त्याच्या वैयक्तिक नातेसंबंध आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे की, अनेक तपशील शेअर करणे योग्य नाही. पण समर सिंह वारंवार आपण निर्दोष असल्याचे सांगत आहे. आपला नाहक छळ केला जात असल्याचे हात जोडून समर सिंह पोलिसांसमोर वारंवार सांगत आहेत. आकांक्षा दुबेच्या मृत्यूमागे हात नसताना हाच प्रश्न पुन्हा विचारला जात आहे.