महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Daler Mehndi: गायक दलेर मेहंदीला उच्च न्यायालयाचा दिलासा, कबुतर फेकीप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा रद्द

पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने गायक दलेर मेहंदीला कबुतरफेकीप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा रद्द केली आहे. यासोबतच त्याला जामीनही मिळाला आहे. (Singer Daler Mehndi) दलेर मेहंदीविरोधात २००३ साली गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात, 14 जुलै 2022 रोजी, कनिष्ठ न्यायालयाने सिंगरला 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती.

गायक दलेर मेहंदी
गायक दलेर मेहंदी

By

Published : Sep 15, 2022, 10:33 PM IST

नवी दिल्ली - गायक दलेर मेहंदीला पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. (2003)च्या मानवी तस्करी प्रकरणात त्याला दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावणाऱ्या पटियाला कोर्टाच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने गुरुवारी (दि. 15 सप्टेंबर)रोजी स्थगिती दिली. यासह दलेरची दोन वर्षांची शिक्षा रद्द झाली असून आता तो जामिनावर तुरुंगातून बाहेर येणार आहे.

दलेर यांच्यावर २००३ साली कबुतरफेकीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने सिंगरला २ वर्षांची शिक्षा सुनावली होती. 14 जुलै रोजी शिक्षा सुनावण्यात आली. दलेर आणि त्याचा भाऊ समशेर यांना अवैधरित्या परदेशात पाठवून मोठी रक्कम घेतल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते. या प्रकरणी दलेर मेहंदी आणि त्याच्या भावावर एकूण 31 गुन्हे दाखल आहेत. त्याची पहिली केस 2003 मध्ये यूएसमध्ये नोंदवण्यात आली होती, कारण दलेर आणि त्याच्या भावाने अमेरिकेला जाण्यासाठी बहुतेक लोकांची तिकिटे कापली होती.

मानवी तस्करीशी संबंधित हे प्रकरण 2003 चे आहे. बख्शीश सिंग नावाच्या एका व्यक्तीच्या तक्रारीवरून पटियाला पोलिसांनी दलेर मेहंदी आणि त्याचा भाऊ शमशेर सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. बेकायदेशीरपणे अमेरिकेत स्थलांतरित होण्यासाठी दोन्ही भावांनी पैसे घेतल्याचा आरोप बक्षीश सिंह यांनी केला होता, परंतु त्यांनी आश्वासन पूर्ण केले नाही. तसेच दलेर मेहंदीने तिला कॅनडाला नेण्यासाठी पैसेही घेतल्याचा आरोप तक्रारदाराने केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details