सिंगापूर: दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूने जपानी खेळाडू सायना कावाकामीचा पराभव केला ( PV Sindhu defeated Saina Kawakami ) आहे. त्याचबरोबर तिने सिंगापूर ओपन सुपर 500 ( Singapore Open Super 500 ) स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या या खेळाडूने उपांत्य फेरीतील 32 मिनिटांच्या सामन्यात 21-15, 21-7 असा विजय मिळवला.
सायना कावाकामीविरुद्ध सिंधूचा विक्रम आता 2-0 असा झाला ( Sindhu record against Saina Kawakami 2-0 ) आहे. यापूर्वी दोघेही चायना ओपन 2018 मध्ये आमनेसामने आल्या होत्या. पीव्ही सिंधू सातत्याने उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे. यावर्षी मार्चमध्ये झालेल्या स्विस ओपननंतर तिने प्रथमच एखाद्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला ( PV Sindhu Reach Singapore Open Final ) आहे. सिंधूने स्विस विजेतेपदावर कब्जा केला होता.