मुंबई - प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, वात्सल्य, माया, ममता, आपलेपण, माणुसकी या सर्व गोष्टींचा संगम 'आई' या दोन शब्दांशी बांधला गेलाय. आईच्या मायेला पाझर फुटतो यापेक्षा आईच्या मायेचा पाझर कधीच आटत नाही हे या नात्याच मुळ. झाडाच्या मुळ्या अमर्याद वाढतात. मात्र, आई नावाच्या झाडाच्या मुळ्यांनी या मर्यादांनाही तिलांजली देत आपलं मुळ अगणित विस्तारलय. (Mother Of Orphans Sindhutai Sapkal Passes Away) दगडासारखं गोठलेल्या बर्फाने पाण्यात वितळावं तस कमालिच्या निष्ठूर माणसाणं आईच्या कुशीत हळव व्हाव हे या ममत्वाच सामर्थ्य. आई नावच वलय सगळ्यांच्याच वाट्याला आलेलं असत. पण, सगळ्यांची मी आई आहे हे वात्सल्य फक्त आईच्या आपलेपणातच सामावलेलं असत. याचं आई नावाच्या नात्याला आणि त्यातील माणुकसीला महासागराच रुप देत कित्येंक निराधारांना आपल्या पदराला घेत त्यांच्यासाठी आपलं आयुष्य कडेला लावलं त्या सिंधूताई सपकाळ अनंताच्या प्रवासाला निघून गेल्या. (Mother Of Orphans Sindhutai Sapkal) या त्यांच्या अनंताच्या प्रवासाला निघून जाण्याने पुन्हा एकदा कित्येकांच्या वाट्याला अनाथपण आलय.
आपल्या आयुष्याची झोळी वेदनांनी भरलेली असताना इतरांच्या वेदनेवर फुंकर घालण्याचं बळ या आई नावाच्या जिव्हाळ्यात सामावलेलं असतं. सगळ्यांच्या वाट्याला हे दु:ख येत नाही. (Anathanchi Maye Sindhutai Sapkal) आणि सगळ्यांच्याच वाट्याला दु:खाची फुलं करण्याचही सुख येत नाही. जे सिंधुताईंच्या वाट्याला आल. अनाथपणाचा शाप मिळालेल्या सिंधुताईंना एकटेपणाने जगण्याच बळही मिळाल असत. (Padma Shri Awardee Sindhutai Sapkal Passes Away) मात्र, एकटेपणासाठी नाही तर हे बळ हजारो अनाथांना सामावून घेणारं ठरलं. रक्ताच्या नात्यालाच आपेपणाची झालर असते हे कधीच खर नव्हत आणि ते खरही ठरणार नाही याची जाणिव करून दिली ती सिंधूताईंनी.
सिंधुताईंना (७४) वर्षांच आयुष्य मिळाल. या आयुष्याने स्वत्वाच्या सिमांना पार करून हजारो हातांना जगण्याचं बळ दिल ते मायेच्या निर्मात्या आई नावाच्या निर्मात्याने. सिंधुताईंचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी वर्धा येथे झाला होता. जन्मताच नकोशी असलेली ही मुलगी. तीचं नकोशेपण इतक टोकाच होत की नकोशेपणाला ठळक करणार चिंधी हे नाव दिल गेल. (Mother Of Orphans Sindhutai Sapkal Dies) पुढे त्या नावाने तीची ओळख बनली होती. मात्र, वेळ जितक हिसकावून घेते त्यापेक्षा कित्येकपट दुमच्या पदरात टाकते. फक्त तुमच्या पदराला आपलेपणासह वात्सल्याचं बळ असावं. हे बळ या बाईच्या नसानसात भिनल होत आणि त्याच मुळ फुलण्याच्या काळात आलेल्या निराधारपणात सामावलेलं होत. याच बळावर चिंधी या नावाला तिलांजली देत ही एकेकाळची निराधार बाई पुढे लाखो अनाथांची माय म्हणून सबंध भारत देशासमोर आदर्श म्हणून उभी राहिली.
मराठी शाळेत चौथीपर्यंत शिकायची संधी मिळाली. पुढे वयाच्या नवव्या वर्षी विवाह नावाच्या बेड्या गळ्यात पडल्या. त्यावेळी २६ वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी हा विवाह झाला. यानंतर 3 बाळंतपण झाली. मात्र, या सर्व काळात वैहाहिक जिवनाशी टोकाचा संघर्ष वाट्याला आला. सासू, नवऱ्याकडून होणारा जाच आयुष्य जगण्याच्या उमेदीपासून तोडणारा होता. हे रोजच जगण वाट्याला आल्याने शेवटी मनात आलेल्या निर्धाराला उमाळा आला आणि वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी समाजकारणाची वाट धरली. आपल्या वाट्याला आलेल्या दु;खाची वेदना उराशी बाळगून त्यावेळी गुरे राखणाऱ्या महिलांसाठी सिंधुताई उभ्या राहिल्या. या स्त्रीयांना काबाड कष्ट करावे लागायचे. मात्र, त्या बदल्यात त्यांना मजुरी मिळत नव्हती. या विरोधात सिंधुताई यांनी लढा उभारला आणि त्याला यशही आलं. त्याच यशाने पुढची वाट दाखवली जी अनाथांची माय म्हणून कोसो दूर जाते.
या कठोर आणि तितक्याच टोकाच्या संघर्षात अनेक मान-सन्मान, पुरस्कार मिळत गेले. जितकी माया पेरली त्याच्या कित्येकपट समाजाकडून मायेच दान मिळाल हे या आई नावाच्या वलयाखाली गोळा केलेल्या लेकरांमुळे! म्हणून पुरस्काराचं मोल लेकरांच्या मायेपेक्षा या आईला कधीच मोठ झाल नाही आणि ते होऊही दिल नाही. हे सगळ काही लेकरांसाठीच ही भावना शेवटपर्यंत उराशी बाळगली. नुकताच केंद्र सरकारकडून 'पद्मश्री' हा बहुमान मिळाला. तोही आपल्या लेकरांना अर्पण करत आपल्या जगण्याचं आणि कामाच मुळ आईने पुन्हा एकदा उलगडल होत.