महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Moosewala Murder Case : सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात बब्बू मान आणि मनकिरत औलख यांची चौकशी - बब्बू मान आणि मनकिरत औलख यांची चौकशी

दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात ( Moosewala Murder Case ) अनेक बड्या गायकांची नावे समोर येत आहेत.पंजाबी गायक सिद्धू मूसवाला हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी आता काही मोठ्या नावांना चौकशीसाठी बोलावण्याचा निर्णय घेतला ( Babbu Maan And Mankirt Aulakh )आहे.

Moosewala Murder Case
सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरण

By

Published : Dec 6, 2022, 2:19 PM IST

नवी दिल्ली :पंजाबचे मानसा पोलीस लवकरच प्रसिद्ध गायक बब्बू मान आणि मनकिरत औलख यांना चौकशीसाठी बोलावू शकतात. ( Babbu Maan And Mankirt Aulakh ) याशिवाय विकी मिद्दूखेडा यांचा भाऊ अजयपाल मिड्दुखेडा यालाही पुन्हा चौकशीसाठी बोलावण्याची शकता आहे . शुक्रवारीही पोलिसांनी त्याची चौकशी केली. ( Moosewala Murder Case )

मुसेवाला यांची मे महिन्यात हत्या :मानसा जिल्ह्यातील जवाहरके गावात जात असताना 29 मे रोजी सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मुसेवाला आपल्या दोन मित्रांसह जीपमधून प्रवास करत होते, त्यावर हल्लेखोरांनी एकापाठोपाठ 30 राऊंड गोळीबार केला. या हल्ल्यात मुसेवाला यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे मित्र जखमी झाले. हत्येच्या एक दिवस आधी मुसेवालाची सुरक्षा हटवण्यात आली होती.

बब्बू मान आणि मनकिरत औलख यांची चौकशी :पोलिसांनी बब्बू मान, मनकिरत औलख आणि पंजाबी चित्रपट निर्मात्याला बोलावण्याची तयारी केली आहे. पोलिसांनी एक यादी तयार केली असून त्यात पंजाबी गायक आणि विक्की मिड्दुखेडा यांचा भाऊ अजयपाल मिड्दुखेडा यांचे नाव आहे.विकी मिड्डूखेडा यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मुसेवाला यांची हत्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे. मुसेवालाचा मॅनेजर शगनदीप सिंग याचे नाव मिड्डूखेडा खून प्रकरणात समोर आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details