चंदीगड (पंजाब): गायक सिद्धू मुसेवालाच्या पालकांनी मंगळवारी पंजाब विधानसभा संकुलाबाहेर धरणे धरले आणि आपल्या मुलाला न्याय मिळावा अशी मागणी केली. त्यांनी या प्रकरणाचा पुढील पाठपुरावा केल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचेही यावेळी संगीतले. सिद्धू मुसेवाला या नावाने प्रसिद्ध असलेल्या शुभदीप सिंग सिद्धूची २९ मे रोजी पंजाबमधील मानसा जिल्ह्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
काँग्रेसचे नेतेही उपस्थित:मुलाच्या हत्येतील मुख्य सूत्रधार अद्याप फरार असल्याचे त्याचे वडील बलकौर सिंग यांनी पत्रकारांना सांगितले. तपास यंत्रणांनी ठोस काहीही केलेले नाही. या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. हे प्रकरण पुढे नेल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. सिंह आणि त्यांची पत्नी चरण कौर यांनी हातात फलक घेऊन विधानसभेबाहेर धरणे आंदोलन केले. त्यांच्यासोबत विधानसभेतील विरोधी पक्षनेते प्रताप सिंह बाजवा यांच्यासह पंजाब काँग्रेसचे काही ज्येष्ठ नेतेही उपस्थित आहेत. गायकाचे वडील म्हणाले, 'आमच्याकडे कोणताही पर्याय नव्हता म्हणून आज आम्ही इथे आलो, गेल्या 10 महिन्यांपासून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. पोलिस आणि प्रशासनाला कारवाईसाठी पुरेसा वेळ देण्यात आला होता.