चंदीगड - पंजाबचा गायक शुभदीप सिंग उर्फ सिद्धू मुसेवालाच्या आई-वडिलांनी शनिवारी चंदीगडमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ( parents of Punjab singer Shubhdeep Singh ) भेट घेतली. सिद्धू मुसेवालाच्या आई-वडिलांनी अमित शाह यांच्याशी 10-15 मिनिटे चर्चा केल्याचे सांगितले ( Amit Shah meet Shubhdeep Singhs father ) जात आहे. मुसेवाला यांच्या कुटुंबीयांनी हत्येची उच्चस्तरीय चौकशी करण्याची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागणी केली आहे. यावेळी भाजपचे अनेक बडे नेतेही उपस्थित होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे भाजप नेत्यांच्या भेटीसाठी पंजाबमध्ये ( Amit Shah Punjab Visit ) दाखल झाले आहेत. यादरम्यान पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत ( law and order situation in Punjab ) चर्चा होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान ( Punjab Chief Minister Bhagwant Mann ) यांनी मारेकर्यांना लवकरात लवकर तुरुंगात टाकणार असल्याची शुक्रवारी ग्वाही दिली होती. सिद्धू मुसेवालाच्या हत्येबाबत पोलिसांना महत्त्वाचे सुगावा मिळाले आहेत. गुन्हेगारांना लवकरच पकडणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी मुसेवालाच्या कुटुंबियांना आश्वासन दिले.
लाखो चाहत्यांना मोठा धक्का बसला-मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, मुसेवाला हे बहुगुणसंपन्न कलाकार होते. त्यांना मंत्रमुग्ध आवाज आणि सर्जनशीलता लाभली होती. ते म्हणाले की त्यांच्या अकाली आणि दुःखद निधनाने संगीत उद्योगाला आणि विशेषतः त्यांच्या लाखो चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. पंजाब सरकारने सुरक्षेत कपात केल्यानंतर २४ तासांपेक्षा कमी कालावधीत गुंडांनी मुसेवाला यांची हत्या केली.