महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सिद्धार्थ शुक्लाचा मृत्यू हृदयविकाराने नाही -पोस्टमॉर्टम रिपोर्ट; आता केल्या जातील या चाचण्या - सिद्धार्थ शुक्ला मृत्यूचे कारण

तिन्ही डॉक्टरांनी सिद्धार्थ शुक्लाच्या केलेल्या शवविच्छेदनाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात आले आहे. हिस्टोपॅथॉलॉजी केल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे सुत्राने सांगितले आहे.

सिद्धार्थ शुक्ला
सिद्धार्थ शुक्ला

By

Published : Sep 3, 2021, 2:56 PM IST

Updated : Sep 3, 2021, 3:40 PM IST

हैदराबाद - टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या पार्थिवाचे शवविच्छेदन मुंबईमधील रुग्णालयात गुरुवारी रात्री करण्यात आले. त्याच्या पार्थिवावर जखमेच्या खुणा आढळून आल्या नसल्याचे सुत्राने सांगितले. व्हिसेराचे परीक्षण केल्यानंतर मृत्यूचे कारण समोर येईल, असे सुत्राने सांगितले आहे.

सिद्धार्थ शुक्लाचा मृत्यू हा ह्रदयविकाराच्या झटक्याने आल्याचे काही रिपोर्टमध्ये म्हटले आहे. मात्र, त्याची पुष्टी मिळाली नाही. अचानकपणे अभिनेता सिद्धार्थचा मृत्यू झाल्याने मनोरंजन क्षेत्र आणि त्याच्या चाहत्यामध्ये दु:खाचे सावट आहे.

हेही वाचा-अभिनेता सिद्धार्थवर ब्रम्हकुमारी विधीनुसार पार पडणार अंत्यसंस्कार, वाचा तपस्विनी काय म्हणाल्या..

हिस्टोपॅथॉलॉजी केल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट

टीव्हीच्या जगातील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन काल झाले. आज (3 सप्टेंबर) सकाळी 11 वाजता सिद्धार्थचे पार्थिव त्याच्या कुटुंबियांकडे सोपवले जाणार आहे. शवविच्छेदन काल (2 सप्टेंबर) दुपारी 3.30 वाजता सुरू झाले. तीन डॉक्टरांनी शवविच्छेदन केले. यावेळी दोन वॉर्डबॉय, व्हिडिओग्राफी टीम आणि दोन साक्षीदार उपस्थित होते. हिस्टोपॅथॉलॉजी केल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे सुत्राने सांगितले आहे.

हेही वाचा-Sidharth Shukla Death: शेहनाझच्या मांडीवर सिद्धार्थनं सोडला जीव? वाचा नक्की काय घडलं त्या रात्री

माध्यमांना मर्यादा ठेवण्याचे पीआर टीमचे आवाहन-

अभिनेता सिद्धार्थचे कुटुंब आणि त्यांच्या जवळच्या व्यक्तींना त्यांच्या दु:खात वेळ मिळवू द्या, असे आवाहन अभिनेताच्या पीआर टीमने केले आहे. तसेच मर्यादा ठेवावी, असेही म्हटले आहे. पीआर टीमने म्हटले, की आम्ही सर्व दु:खात आहोत. तुमच्याप्रमाणेच आम्हाला धक्का बसला आहे. सिद्धार्थ हा वैयक्तिक आयुष्य जपत होता, हे तुम्हा सर्वांना माहित आहे. त्यामुळे त्याच्या व कुटुंबाच्या खासगी आयुष्याचा आदर करा. कृपया त्याच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी प्रार्थना करा.

हेही वाचा-LIVE : सिद्धार्थ शुक्लाच्या पार्थिवावर आज ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार; कूपर रुग्णालयातून निघाली अंत्ययात्रा

शुक्रवारी पार्थिवावर अंत्यसंसस्कार होणार

आज (3 सप्टेंबर) सकाळी 11 वाजता सिद्धार्थचे पार्थिव त्याच्या कुटुंबियांकडे सोपवले आहे. मुंबई पोलीस आज अधिकृत निवेदन जारी करणार आहेत आणि शवविच्छेदन अहवालही आज सिद्धार्थच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करणार आहेत. सिद्धार्थ शुक्लाचा मृतदेह सर्वप्रथम जुहू येथील ब्रह्माकुमारी कार्यालयात नेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. येथे पूजा केल्यानंतर, मृतदेह त्याच्या घरी नेण्यात येईल.

Last Updated : Sep 3, 2021, 3:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details