सिध्दार्थनगर: उत्तर प्रदेशचे आरोग्य मंत्री जय प्रताप सिंह यांच्या जिल्ह्यातील आरोग्य विभागात गोंधळ उडाला आहे. जिल्ह्यातील औदही कलां गावात लसीकरणादरम्यान काही लोकांना कोविशील्डचा पहिला तर १४ मे रोजी कोवॅक्सीनचा दुसरा डोस देण्यात आला आहे. त्यामुळे लसीकरण केलेल्या लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोकांमध्ये भीतीचे वातावरण कायम
या घटनेने आरोग्य विभागात गोंधळ उडाला आहे. लसीकरण केलेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. २ एप्रिल रोजी यांना कोविशील्डचा पहिला डोस तर १४ मे रोजी दुसरा डोस हा कोव्हॅक्सीनचा देण्यात आला आहे. याचा दुष्परीणाम झाला नसला तरी लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
आरोग्य विभागाचे लक्ष
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार मालती देवी, छेदीलाल, सनेही, रामकुमार, गोपाल, मुन्नी, शहाबुद्दीन, मोहम्मद इकराम धोबी, रामसूरत, राधेश्याम शुक्ल, अनारकली, चंद्रावती, सोमना, बेलावती, इंद्र बहादुर, रामकिशोर, उर्मिला मालती देवी, रामप्रसाद व नंदलाल चौधरी आदी लोकांना चुकीची लस देण्यात आली आहे. त्यांच्या आरोग्यावर विभागाचे लक्ष आहे.
चौकशी समिती स्थापन
या विषयावर सीएमओ संदीप चौधरी यांना विचारले असता त्यांनी चुकीचे लसीकरण झाल्याचे मान्य केले आहे. तसेच या घटनेचा तपास करण्यासाठी पथक नेमण्यात आले असून, योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर लसीकरण केलेल्या लोकांवर आरोग्य विभागाचे लक्ष आहे, तसेच आतापर्यंत त्यांना कोणताही त्रास झाल्याचे आढळून आले नाही, असेही ते म्हणाले.
हेही वाचा -'मला मुलगी हवी होती' म्हणत, दारूच्या नशेत बापाने एक वर्षाच्या चिमुकल्याला दगडावर फेकले