बंगळुरू: सिद्धरामय्या हे कर्नाटकातील स्वच्छ प्रतिमेचे आणि काँग्रेसचे विश्वासून नेते म्हणून देशभर ओळखले जातात. ते आजही पांढर्या धोतरात आणि सोनेरी किनारी अंगवस्त्र असलेला पांढरा कुर्ता परिधान केलेले दिसून येतात. कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 ही त्यांची शेवटची निवडणूक लढाई असल्याचे त्यांनी घोषित केल्यानंतर त्यांच्या संपूर्ण देशात चर्चा झाली
सुरुवातीपासून सिद्धरामय्या हे कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार होते. काँग्रेस हायकमांडने मुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्या नावाला मंजुरी दिल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये जल्लोष सुरू झाला आहे. मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी डीके शिवकुमार यांच्यासोबत कोणतेही मतभेद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. जाणून घेऊ, त्यांचा राजकीय प्रवास जाणून घेऊ.
शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी:सिद्धरामय्या यांचा जन्म 12 ऑगस्ट 1948 रोजी म्हैसूर जिल्ह्यातील वरुणा होबळी येथील सिद्धरामन हुंडी या दुर्गम भागात झाला. सिद्धराय्या हे गरीब शेतकरी कुटुंबातून आले आहेत. ग्रामीण कुटुंबातून आलेले सिद्धरामय्या हे म्हैसूर विद्यापीठातून बीएससी पदवी मिळवणारे त्यांच्या कुटुंबातील पहिले व्यक्ती ठरले होते. त्यांनी म्हैसूर विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतल्यानंतर काही काळ वकिली केली. विद्यार्थीदशेपासून सिद्धरामय्या हे त्यांच्या वक्तृत्व कौशल्यासाठी ओळखले जातात. त्यांच्यावर डॉ. राम मनोहर लोहिया यांनी मांडलेल्या समाजवादाचा प्रभाव राहिला आहे. दलित आणि समाजातील दुर्बल घटकांना सामाजिक न्याय आणि आर्थिक प्रगती मिळवून देण्यासाठी सिद्धरामय्या यांनी राजकारणात प्रवेश केला.
1983 मध्ये विधानसभेत प्रवेश: भारतीय लोक दल पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढविली. 1983 मध्ये म्हैसूर जिल्ह्यातील चामुंडेश्वरी विधानसभा मतदारसंघातून सदस्य म्हणून कर्नाटक विधानसभेत प्रवेश केला. राज्याच्या कन्नड भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. राज्याचे रेशीम राज्यमंत्री पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा मंत्री, परिवहन मंत्री अशी विविध मंत्रालये त्यांनी हाताळली आहेत.