नवी दिल्ली - पटियाला हाउस न्यायालयाने टूलकीट प्रकरणात पर्यायवरणवादी शुभम चौधरीला अटकेपासून 15 मार्च पर्यंत संरक्षण दिले आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी 15 मार्चला होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने 3 मार्चला शुभमला ट्रान्झिट अटकपूर्व जामीन दिला होता. टूलकीट प्रकरणात शुभमला फसवण्यात आल्याचे याचिकेत म्हटलं आहे.
टूलकीट प्रकरण : शुभम चौधरीला अटकेपासून 15 मार्चपर्यंत संरक्षण - पर्यायवरणवादी शुभम चौधरी
पटियाला हाउस न्यायालयाने टूलकीट प्रकरणात पर्यायवरणवादी शुभम चौधरीला अटकेपासून 15 मार्च पर्यंत संरक्षण दिले आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी 15 मार्चला होणार आहे.

शुभम चौधरीला अटकेपासून 15 मार्चपर्यंत संरक्षण
टूलकीट प्रकरणी पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीला 23 फेब्रुवारीला जामीन दिला होता. पटियाला हाऊस न्यायालयाने दिशाला 14 फेब्रुवरीला बंगळुरूमधून अटक केली होती. चौकशीदरम्यान दिशाने शांतुन, निकिताची नावे घेतली होती. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी दिशा रवीला चौकशीसाठी 22 जानवरीला बोलावले होते. त्यानंतर न्यायालयाने शांतनु आणि निकिताला 15 मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले होते. दोन्ही प्रकरणात न्यायालय 15 मार्चला सुनावणी करणार आहे. या याचिकांवर न्यायाधीश धर्मेंद्र राणा सुनावणी करतील.