महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Shri Krishna Janmashtami देशाच्या प्रत्येक राज्यात श्री कृष्ण जन्माष्टमी साजरी

देशभरात आज कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जात आहे Shri Krishna Janmashtami . देशाच्या प्रत्येक राज्यात याची तयारी, उत्सव पहायला मिळत आहे.

Shri Krishna Janmashtami
Shri Krishna Janmashtami

By

Published : Aug 19, 2022, 1:10 PM IST

मथुरा देशभरात कृष्ण जन्माष्टमी मंदिरांची सजावट केली जात आहे. मंदिरांना रंगीबेरंगी रोशनाई करण्यात आली आहे. कोरोना संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून कृष्ण जन्मोत्सव Shri Krishna Janmashtami साजरा करता आला नाही. मथुरा येथे गुरुवार रात्रीपासून भक्तांचे आगमन सुरू होते. संपूर्ण देशामध्ये 'जय श्री कृष्ण' चा जयकार पहायला मिळाला.

इस्कॉन मंदिरात भाविकांची गर्दीमुंबई आणि उत्तर प्रदेशातील नोएडा येथील इस्कॉन मंदिरात भाविक गर्दी Devotees Crowd In ISKCON Temple करत आहेत. कृष्ण भक्त इस्कॉन मंदिरात दर्शन घेण्यासाठी पोहोचले आहेत. जन्माष्टमीच्या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांसोबत संवाद साधला. श्री कृष्ण जन्माच्या पावन पर्वावर, मी भारत आणि परदेशात रहाणाऱ्या श्री कृष्ण भक्तांना हार्दिक शुभेच्छा देते असे त्यांनी म्हटले.

योगी आदित्यनाथ यांची दुसऱ्यांदा मथुरेत जन्माष्टमी साजरी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सगल दुसऱ्यांदा मथुरेत जन्माष्टमी साजरी करत आहेत. कार्यक्रम वृंदावन येथून सुरू होणार आहे. यापूर्वी योगी आदित्यनाथ यांनीही ट्विट करून जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. आज 8 लाख भाविक मथुरेत आले आहेत. कानपूरच्या इसकॉन मंदिरात भक्तांचा उत्साह दिसत आहे. चंदीगडमध्ये कृष्ण जन्माष्टमीनिमित्ताने संपूर्ण शहर रंगीबेरंगी दिव्यांनी उजळून निघाले आहे.

केझिकोडच्या मंदिरात भाविक मोठ्या संख्येने दाखल केरळ केझिकोडच्या मंदिरात भाविक मोठ्या संख्येने जमतात. कोझिकोडमध्ये कृष्णजन्माच्या संधिचा काढण्यात आला. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये दहीहंडी स्पर्धेची चर्चा होती. मुंबईत दोन वर्षानंतर पुन्हा एकदा कृष्ण जन्माष्टमी मोठ्या थाटामाटात साजरी होत आहे. करोनामुळे गेल्या दो वर्षापासून मुंबई शाहरात जन्माष्टमीचा कार्यक्रम रोकला गेला. पन यावर्षी पुन्हा एकदा संपूर्ण शहर गोविंदा आला रे आलाचा आवाज ऐकू येईल.

दहीहंडी सणाला साहसी दर्जा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दहीहंडी सणाला साहसी दर्जा देण्याचा निर्णय जाहीर केला. दह्याने भरलेली हंडी हवेच्या मधोमध लटकलेले असते. मानवी मनोऱ्यांच्या मदतीने दह्याने भरलेली हंडी म्हणजेच दही हंडी फोडली जाते. यात सहभागी झालेले तरूण पुढे सरकारी नोकरीसाठी अर्ज करू शकतात असेही त्यांनी पुढे नमूद केले आहे. मानवी पिरॅमिड बांधताना कोणत्याही खेळाडूला दुखापत झाल्यास सहभागी किंवा त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई दिली जाईल असेही ते म्हणाले. दहिहंडीसाठी फोडण्यासाठी थर तयार करताना सहभागीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची सानुग्रह रक्कम मिळेल. एखाद्या खेळाडूला गंभीर दुखापत झाल्यास 7 लाख रुपये आणि किरकोळ दुखापतीसाठी 5 लाख रुपये दिले जातील, असे ते म्हणाले.

हेही वाचाDahi Handi 2022 गोविंदा आला रे, महाराष्ट्रात दहीहंडीचा जाणून घ्या इतिहास

ABOUT THE AUTHOR

...view details