शेगावसंतश्रेष्ठगजानन महाराज हे महाराष्ट्रातील महान संत आहेत. शेगाव संस्थान त्यांच्यामुळेच नावारूपाला आले आहे. बुलढाणा जिल्ह्यात येणाऱ्या शेगाव येथील गजानन महाराजांना जन्म कधी झाला हे कोणालाही माहीत नाही, परंतु ते पहिल्यांदा त्यांच्या वयाच्या २० व्या वर्षी म्हणजे १८७८ च्या फेब्रुवारी महिन्यात २३ तारखेला शेगावात दिसले. त्यांचे अनुयायी ही तिथी गजानन महाराज प्रकट दिन Gajanan Maharaj manifest day म्हणून मोठ्या उत्साहाने साजरी करतात आणि ऋषीपंचमी हा दिवस संजीवन समाधी उत्सव म्हणून पाळला जातो.
महाराजांचे जीवनवर्णन करणारा ग्रंथ श्री दासगणू महाराजांनी लिहिला असून त्याचे नाव श्री गजानन विजय ग्रंथ असे आहे. यात महाराजांच्या आयुष्यातील अनेक आख्यायिका आणि ऐतिहासिक घटना वाचायला मिळतात. वर्णनाप्रमाणे सहा फुटी सडसडीत शरीरयष्टी, रापलेला तांबूस वर्ण, तुरळक दाढी व केस, वस्त्रविहीन शरीर आणि गुडघ्यापर्यंत पोचणारे हात अशी त्यांची देहचर्या होती. पाय अनवाणी आणि हाती असलीच तर एखादी चिलीम व तिला छापी - कपडा गुंडाळलेला असे.
झुणका भाकरीसोबतच मुळ्याच्या शेंगामहाराज कधी कधी ते चित्रविचित्र पणे खात तर कधी तीन-चार दिवस उपाशी रहायचे असे सांगितले जाते. भक्तांकडून येणारे पंचपक्वान्नाचे ताट असो वा कुणी कुत्सितपणे दिलेला वाटलेल्या मिरच्यांचा ठेचा असो ते सगळे प्रसन्न भावाने सेवन करत. गरीबाघरी जे अन्न सहजपणे उपलब्ध होऊ शकेल अशाच प्रकारचे अन्न म्हणजे ज्वारीची भाकरी, अंबाडीची भाजी, पिठले असे पदार्थ महाराज आवडीने खात. मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या, पिठीसाखर हे पदार्थ कोणी आणून दिले की ते हरवून जात. आजही महाराजांच्या भंडाऱ्यासाठी इतर पक्वान्नांव्यतिरिक्त ज्वारीची भाकरी, पिठले आणि अंबाडीची भाजी अवश्य करतात.
महाराजांची भ्रमंती अवतारकार्यातील ३२ वर्षांचा काळ त्यांनी संपूर्णपणे व्यतीत केला असला तरी कारणपरत्वे महाराजांची भ्रमंती अकोला, मलकापूर, नागपूर, अकोट, दर्यापूर, अकोली-अडगाव, पिंपळगाव, मुंडगाव, रामटेक, नांदुरा, अमरावती, खामगाव या विदर्भातल्या प्रमुख भागांतल्या खेड्यापाड्यांतून झालेली आहे. उन्हापावसातून वस्त्रविहीन अवस्थेत भरभर चालणाऱ्या महाराजांची चालगती गाठण्यासाठी त्यांच्या भक्तांना अक्षरश: धावावे लागत असे असे दाखले आहेत. पंढरपूर वारी महाराज भक्तांसोबत वारीच्या निमित्ताने दरवर्षी पंढरपूर येथे जात. नाशिक त्र्यंबकेश्वर येथेही ते नित्यनेमाने जात.