नवी दिल्ली -श्रद्धा खून प्रकरणी पोलिसांना दोन्ही डीएनए आणि पॉलीग्राफ चाचणी अहवाल प्राप्त झाले आहेत. काही हाडांचे नमुने श्रद्धाच्या वडिलांच्या ( Shraddha murder case ) डीएनएशी जुळले आहेत. ते श्रद्धाचेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही हाडे दिल्ली पोलिसांनी मेहरौली आणि गुरुग्रामच्या जंगलातून गोळा ( Shraddha murder case Bone samples ) केली होती. जप्त केलेले मृतदेहाचे भाग शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येणार आहेत व पुढील तपास सुरु आहे.
आफताबच्या हालचालींवर लक्ष :कारागृहातील सूत्रांनी असेही सांगितले की, आफताबला बुद्धिबळाची आवड असून तो बोर्डाच्या दोन्ही बाजूंनी वेगवेगळे डावपेच आणि खेळ करतो. तो बुद्धिबळाचा चांगला खेळाडू आहे. आफताबसोबत असलेले दोन कैदी चोरीच्या गुन्ह्यात अंडरट्रायल आहेत. आफताबवर बारीक लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. आफताब स्वतःच्या विरोधात त्याच्या हालचालींची योजना आखत आहे आणि दिल्ली पोलिसांना सुरुवातीपासूनच आफताब खूप हुशार असल्याचा संशय होता. त्याची प्रत्येक हालचाल सुनियोजित कटाचा भाग आहे असे दिसते, जसे की तो बुद्धिबळाच्या दोन्ही बाजूंनी खेळतो.
आफताबच्या वागणुकीवर संशय : तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, आफताबने दिल्ली पोलिसांनी त्याला सांगितलेल्या प्रत्येक आदेशाचे पूर्णपणे पालन केले होते. त्याने आपला गुन्हा मान्य केला. पोलिसांना सहकार्य केले आणि पॉलीग्राफ आणि नार्को चाचणी घेण्याचेही मान्य केले. मात्र आता त्याच्या चांगल्या वागणुकीवर पोलिसांना संशय येऊ लागला आहे. त्याची तयारी त्याने आधीच केल्याचे त्याच्या उत्तरावरून दिसते. चौकशीत त्याने चिनी चॉपरने श्रद्धाची हत्या केल्याची कबुली दिली.