नवी दिल्ली : श्रद्धा हत्याकांडातील (Shraddha Murder Case) आरोपी आफताब पूनावालाच्या (Aftab Poonawalla) जामीन अर्जावर साकेत न्यायालयात सुनावणी होणार आहे. गुरुवारी सकाळी 10.10 वाजता आफताबला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी आफताबने जामीन अर्ज मागे घेतला. (Aftab Poonawalla withdraws bail plea). आफताबच्या वकिलाने सांगितले की, तुरुंगात गेल्यावर आफताबशी 50 मिनिटे बोलणे झाले. त्यानंतर आज पुन्हा न्यायालयात पेशी झाली. या दरम्यान आफताबने न्यायाधीशांना याचिका मागे घ्यायची असल्याचे सांगितले.
न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर : आपल्या लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरचा गळा दाबून खून केल्याचा आरोप असलेल्या आफताबने 17 डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान दिल्ली न्यायालयाला सांगितले होते की त्याने वकलतनामावर स्वाक्षरी केली आहे. परंतु त्याच्या वतीने जामीन अर्ज दाखल केला जाईल याची माहिती नव्हती. आज सकाळी 10.10 वाजता आफताब व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश वृंदा कुमारी यांच्या न्यायालयात हजर झाला. यानंतर न्यायाधीशांनी त्याला सकाळी 11 वाजता पुन्हा व्हीसीमध्ये हजर राहण्यास सांगितले आहे, त्यानंतर सुनावणी होईल.