महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Crime News : चोरीच्या आरोपावरून दुकानदाराची अल्पवयीन मुलाला नग्न करुन बेदम मारहाण - Chilli powder in boy eye

शिमला येथे एका दुकानदाराने किरकोळ चोरीच्या आरोपावरून एका अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर त्या दुकानदाराने मुलाला विवस्त्र करून भरचौकात आणले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Chilli powder in boy eye) (Shimla Crime)

Crime News
क्राइम न्यूज

By

Published : Aug 5, 2023, 7:38 PM IST

Updated : Aug 5, 2023, 7:53 PM IST

पोलिसांनी आरोपी दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला

शिमला : हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील रोहडू येथे एका दुकानदाराने आधी एका मुलाला विवस्त्र केले आणि नंतर त्याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून मारहाण केली. त्या मुलावर दुकानातून काही खाद्यपदार्थ चोरल्याचा आरोप होता.

मुलगा मूळचा नेपाळचा : पीडित अल्पवयीन मुलगा मूळचा नेपाळचा आहे. त्याचे वय केवळ 15 वर्षे आहे. 30 जुलै रोजी या मुलाने रोहडू येथील दुकानातून काही खाद्यपदार्थ चोरले होते. दुकानदाराने त्याला चोरी करताना पाहिले, परंतु मुलगा तेथून पळून गेला होता. दुसऱ्या दिवशी दुकानदाराने त्या मुलाला भर बाजारात पकडून मारहाण केली. ही घटना 31 जुलैची आहे, ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दुकानदाराने मुलाला बेदम मारहाण केली आणि त्याला विवस्त्र करून बाजारात नेले, अशी तक्रार अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी पोलिसांत दिली आहे. तसेच मुलाच्या डोळ्यात मिरचीपूड देखील टाकली, असे ते म्हणाले. त्यावेळी आजूबाजूचे लोक केवळ बघ्याच्या भूमिकेत होते, असा आरोप वडिलांनी केला आहे.

बाल न्याय कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल : या मुलाची आई गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होती आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ज्या दिवशी मुलावर हल्ला झाला, त्याच दिवशी संध्याकाळी मुलाच्या आईचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पीडिताच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आरोपी दुकानदाराविरुद्ध बाल न्याय कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आरोपी दुकानदाराला अद्याप अटक करण्यात आलेली नाही, असे रोहडूच्या डीएसपींनी सांगितले.

व्हिडिओ शेअर करणाऱ्यांवर कारवाई करणार : पोलिसांनी या प्रकरणी बाल न्याय कायद्याच्या कलम 341, 323 आणि 75 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 'अल्पवयीनाशी अशाप्रकारचे वर्तन हा गंभीर गुन्हा असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपींना लवकरात लवकर अटक करून कडक कारवाई करण्यात येईल', असे डीएसपींनी सांगितले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मुलाची ओळख उघड होत असल्याने व्हिडिओ बनवणाऱ्यांवर तसेच तो शेअर करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा :

  1. Mumbai Crime News : 'त्या' लेडीज गॅंगमध्ये सासू, सून अन् मुलगीच ड्रग्ज सप्लायर! पोलिसांनी आवळल्या मुसक्या
  2. Shirdi Crime News : दिवसभर करायचा साई संस्थानचे काम अन् रात्री....; आरोपीला शिर्डी पोलिसांनी 'रंगेहाथ' पकडले
  3. Fake Kidnapping : आठवीच्या विद्यार्थ्याने गृहपाठ केला नाही म्हणून रचला स्वत:च्याच अपहरणाचा कट! वाचा कसे फुटले बिंग
Last Updated : Aug 5, 2023, 7:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details