नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयात ( Supreme Court ) आज महत्वपुर्ण सुनावणी होणार आहे. शिवसेना ( shivsena )आणि शिंदे सरकारच्या ( Shinde Govt ) भवितव्याचा महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयात शिंदे गट आणि शिवसेनेकडून दाखल कऱण्यात आलेल्या याचिकेत एकत्रित सुनावणी होणार आहे. अनेक प्रश्नांची उत्तर मिळतील अशी अपेक्षा आहे. दरम्यान सुप्रीम कोर्टात सुनावणी आधी शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आणि न्यायाधीशांवर विश्वास दाखवला आहे.
संजय राऊतांची प्रतिक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे आमचे लक्ष आहे. आज निर्णय येईल, असं वाटत नाही. आम्हाला न्याय मिळणार आहे. तसेच लोकशाही जिवंत आहे आणि तिची उघडपणे कोणी हत्या करु शकत नाही. याबद्दल न्यायाधीशांकडून खात्री आहे,” असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
कायदा आणि घटनेची पायमल्ली करत फुटीर गटाला मान्यता देत असण्याचा प्रयत्न होत आहे, तसंच पक्षांतर बंदी कायद्याचे पालन होत नसल्याने आम्हाला सर्वोच्च न्यायालयात जावे लागले आहे. लोकशाहीसाठी न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालय एकमेव आशेचा किरण आहेत,” असंही त्यांनी सांगितलं.
शिंदे हे भाजपचे मुख्यमंत्री असल्याची नुकतेच केली टीका- कोणत्याही लढाईसाठी दोन हात करण्याची ( Shivsena Leader Sanjay Raut ) तयारी आहे. छुपे वार सुरू आहेत. महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचे प्रयत्न आहे. शिंदे हे भाजपचे मुख्यमंत्री, त्यांचे दौरे होणारच अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. महाराष्ट्रात पूरस्थिती गंभीर झालेली आहे. अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मात्र दिल्लीमध्ये आपले सरकार वाचविण्यासाठी आले आहेत. दिल्लीत ते निवडणूक आयोगाकडे जातील, आणखी कुठे कुठे जातील. कारण ते आता भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री आहेत. ते शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत, अशी टिकाही संजय राऊत यांनी केली.
पत्राचाळ कथित घोटाळ्याप्रकरणी समन्स-शिवसेना खासदार संजय राऊत यांना पुन्हा ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. पत्रा चाळ प्रकरणात संजय राऊत यांना पुन्हा ईडीकडून समन्स पाठवण्यात आले आहे. यापूर्वी देखील संजय राऊत यांची आठ तास चौकशी करण्यात आली होती. संजय राऊत यांना आज ( 20 जुलै ) चौकशीला हजर राहण्याचे निर्देश ईडीने समन्समधून देण्यात आले आहे. शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांना पुन्हा ईडीने चौकशीकरिता बुधवारी (20 जुलै) मुंबईतील ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावलं आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ कथित घोटाळ्याप्रकरणी समन्स बजावले आहे. यापूर्वी 7 जुलै रोजी 10 तास संजय राऊत यांची चौकशी करण्यात आली होती.
संजय राऊतांचे निकटवर्तीयांची चौकशी - संजय राऊत यांना ईडीच्या मुंबई कार्यालयाकडून मंगळवारी समन्स बजावण्यात आले आहे. बुधवारी 20 जुलै रोजी त्यांना चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी त्यांना हे समन्स बजावण्यात आले आहे. यापूर्वी दोन वेळा राऊतांची चौकशी झाली आहे. याच प्रकरणी ईडीने आज संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर आणि स्वप्ना पाटकर यांची सुमारे सहा तास चौकशी करण्यात आली, त्यानंतर त्यांना सोडण्यात आले. पण आता राऊतांना नोटीस बजावली असून उद्या त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
हेही वाचा -Sanjay Raut with Uddhav Thackeray : संकटातही पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची साथ, संजय राऊत यांचे सूचक ट्विट