नवी दिल्ली -शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. देशात लोकशाही व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. विरोधकांनी एकत्र येऊन विरोध करण्याची गरज असल्याचे संजय राऊत राहुल गांधी यांच्या भेटीनंतर म्हणाले.
संजय राऊत पत्रकारांशी बोलताना राहुल गांधींची भेट घेण्यासाठी जाण्यापूर्वी संजय राऊत यांनी माध्यमांना सांगितले की, प्रियंका गांधींना यूपी पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे याबाबत राहुल गांधींची भेट घेणे आवश्यक आहे. जर देशात कायदा सर्वांना समान आहे तर शेतकऱ्यांना चिरडणारा नेता खुलेआम फिरतोय आणि प्रियंका गांधी यांना अटक का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
“लखीमपूर खेरी येथे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसोबत झालेल्या हिंसाचाराचाच्या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. त्यातच, उत्तर प्रदेश सरकारने प्रियांका गांधींना 28 तास नजरकैदेत ठेऊन आज अटक केली आहे. अशावेळी एकजुटीने काम करण्याची आवश्यकता असून मी आज याबाबत राहुल गांधी यांची भेट घेईन”, असं ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. संध्याकाळी ४.१५ वाजता राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्यात भेट होणार आहे. लखीमपूर हिंसाचार प्रकरणाने राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघत आहे. या प्रकरणानंतर भाजप सरकारविरोधक सर्वपक्षीय विरोधक एकवटले आहेत.
हे ही वाचा - Lakhimpur Kheri Violence : जमावबंदी आदेशाच्या उल्लंघन प्रकरणी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना यूपी पोलिसांकडून अटक