महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Sanjay Raut Appeared In Court : कर्नाटक निवडणुकीत धडाडणार खासदार संजय राऊतांची तोफ, बेळगावात घेणार सभा - महाराष्ट्र एकीकरण समिती

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी बेळगावच्या न्यायालयात हजेरी लावली. यावेळी आगामी कर्नाटक निवडणुकींमध्ये आपण प्रचार करुन सभा घेणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.

Sanjay Raut Appeared In Court
संग्रहित छायाचित्र

By

Published : May 4, 2023, 10:44 AM IST

बेळगावी :शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत हे बुधवारी बेळगावच्या जिल्हा सत्र न्यायालयात हजर झाले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या खटल्याच्या सुनावणीसाठी संजय राऊत यांनी बेळगाव न्यायालयात हजेरी लावली. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या खटल्याप्रकरणी जामीनासाठी न्यायालयात आल्याची माहिती त्यांनी यावेळी माध्यम प्रतिनिधींना दिली. यावेळी आगामी कर्नाटक निवडणुकीत आपण प्रचार करुन सभा घेणार असल्याची माहितीही संजय राऊत यांनी यावेळी दिली.

खासदार संजय राऊत

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रकरणांची सुनावणी :महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रकरणांची न्यायालयात सुनावणी सुरू असते. त्या प्रकरणांच्या सुनावणीसाठी मी न्यायालयात आल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. त्यासह त्यांनी या प्रकरणांची चौकशी झाली असल्याचेही स्पष्ट केले.

कर्नाटकात करणार प्रचार :सध्या कर्नाटकमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे शिवसेना कर्नाटक निवडणुकींमध्ये प्रचार करणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. मी कर्नाटक निवडणुकीत खानापूर, बेळगावी दक्षिण आणि उत्तर मतदार संघात एमईएस उमेदवारांचा प्रचार करणार आहे. नंतर मी जाहीर सभेला संबोधित करणार असल्याचेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

महाराष्ट्रात 100 कर्नाटक बस जाळण्यात येतील : बेळगाव येथे 2018 मध्ये मेळाव्याच्या कार्यक्रमादरम्यान संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. बंदी असतानाही राऊत यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यात भाग घेतला होता. त्यानंतर कर्नाटकमध्ये महाराष्ट्राच्या बसवर दगडफेक झाल्यास महाराष्ट्रात 100 कर्नाटक बस जाळण्यात येतील, असे विधान केल्याचा आरोप संजय राऊत यांच्यावर आहे. याबाबत संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

काय म्हणाले संजय राऊत यांचे वकील :संजय राऊत यांनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्याची दखल कर्नाटकात घेण्यात आली होती. या प्रकरणी संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्त आला होता. या प्रकरणाची बुधवारी न्यायालयात सुनावणी झाली. या खटल्यात संजय राऊत यांना यापूर्वीच सशर्त जामीन मंजूर करण्यात आला होता. आता या प्रकरणात न्यायाधीश मुस्तफा सय्यद यांनी संजय राऊत यांना जामीन मंजूर केला आणि खटल्यातून निर्दोष मुक्तता केल्याची माहिती संजय राऊत यांचे वकील श्यामसुंदर पट्टर यांनी दिली.

हेही वाचा - Wrestlers Protest : जंतरमंतरवर पोलीस आणि कुस्तीपटूंमध्ये मध्यरात्री रंगला सामना, पोलिसांनी मारहाण केल्याचा कुस्तीपटूंचा आरोप

ABOUT THE AUTHOR

...view details