अमृतसर :शिवसेनेचे नेते सुधीर सुरी (Shiv Sena leader Sudhir Suri shot dead) यांची अमृतसरमध्ये शुक्रवारी झालेल्या आंदोलनादरम्यान गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना एका मंदिराबाहेर घडली जिथे शिवसेना नेते आंदोलनासाठी जमले होते. या घटनेनंतर अमृतसरमधील वातावरण तणावाचे झाले आहे. यातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, पोलिसांनी मोठा बंदोबस्त परिसरात लावला (Shiv Sena leader Sudhir Suri) आहे.
दोनवेळा शिवसेना नेत्यांवर हल्ला -दरम्यान, दोन दिवसांत शिवसेना नेत्यावर झालेला हा दुसरा हल्ला आहे. याआधी गुरुवारी, टिब्बा रोडवरील ग्रेवाल कॉलनीतील पंजाब शिवसेना नेते अश्वनी चोप्रा यांच्या घराजवळ दोन दुचाकीस्वारांनी कथित गोळीबार केला होता. त्यानंतर आज सुधीर सुरीवर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली आहे.
मंदिरासमोर करत होते आंदोलन -पंजाबमधील शिवसेना नेते सुधीर सुरी यांच्यावर अमृतसरमध्ये गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. सुधीर सुरी हे अमृतसरमध्ये एका मंदिराच्या बाहेर निदर्शने करत होते. त्यावेळी जमलेल्या गर्दीतून पुढे आलेल्या एकाने त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पंजाबमधील आणखी एक शिवसेना नेते अश्वनी चोप्रा यांच्यावरही गुरुवारी प्राणघातक हल्ला झाला होता.
सुरी यांना मारण्याचा शिजत होता कट -सुधीर सुरी अमृतसरमधील एका मंदिराबाहेर निदर्शने करत असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्याचवेळी गर्दीमधील एका अज्ञात व्यक्तीनं त्यांच्यावर गोळीबार केला. दरम्यान, मागील काही दिवसांपासून सुधीर सुरी यांच्यावर हल्ल्याची योजना करण्यात येत होती. दिवाळीमध्येच त्यांच्यावर हल्ला करण्यात येणार होता. गेल्या माहिन्यात पोलिसांनी काही गँगस्टरला अटक केली होती. यावेळी चौकशीदरम्यान आरोपींनी हा खुलासा केला होता. पंजाबमध्ये एसटीएफ आणि अमृतसर पोलिसांनी एकत्र कारवाई करत महिन्याभरात चार गँगस्टरला अटक केली होती. या आरोपींची चौकशी केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे झाले होते.