दादरा नगर हवेली -येथीलदादरा नगर हवलेची खासदार मोहन डेलकर यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई येथे येऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर राजकारणात खळबळ उडाली होती. त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेकडून दिवंगत मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांचा 40 हजार मतांनी विजय झाला आहे.
भाजप आणि काँग्रेस उमेदवाराचा पराभव -
कलाबेन डेलकर यांनी भाजपच्या महेश गावित आणि काँग्रेसच्या महेश धोडी यांचा पराभव केला. दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाचा भाग असलेल्या दादरा आणि नगर हवेलीमधील सिल्वासा शहरातील कराड भागात सकाळी 8.30 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. अनुसूचित जमाती (एसटी) उमेदवारांसाठी राखीव असलेल्या या लोकसभा जागेसाठी ३० ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक झाली.
भारतीय जनता पक्षापासून वेगळी झालेली शिवसेना महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यातही आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. याच प्रयत्नात शिवसेनेने गुजरातमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक लढवण्याचे जाहीर केले होते. गुजरातमधील दादरा-नगर हवेली लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली. येथील खासदार मोहन डेलकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणूक झाली. येथून शिवसेनेने दिवंगत मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन यांना उमेदवारी देण्यात आली होती.