महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Shivsena Symbol dhanushban Hearing : शिवसेना धनुष्यबाण चिन्हाचा दावा : ठाकरे गटाने सादर केले 'हे' उत्तर - शिवसेनेचा धनुष्यबाण चिन्हाचा दावा

शिवसेनेचा 'धनुष्यबाण' चिन्हाचा दावा ( Shiv Sena Bow Arrow symbol claim Thackeray group ) नेमका कुणाचा यावर निवडणूक आयोगाकडे ( Election Commission ) सुनावणी सुरू ( hearing of dhanushban symbol ) आहे. काल यासंदर्भात प्राथमिक उत्तर दाखल केले होते.आजही आम्ही उत्तर दाखल केले, असे ठाकरे गटाच्या ( Shiv Sena Thackeray group ) वकीलांनी सांगितले.

धनुष्यबाण
धनुष्यबाण

By

Published : Oct 8, 2022, 3:06 PM IST

Updated : Oct 8, 2022, 6:10 PM IST

नवी दिल्ली - शिवसेनेचा 'धनुष्यबाण' चिन्हाचा दावा ( Shiv Sena Bow Arrow symbol claim Thackeray group ) नेमका कुणाचा यावर निवडणूक आयोगाकडे ( Election Commission ) सुनावणी सुरू ( hearing of dhanushban symbol ) आहे. काल यासंदर्भात प्राथमिक उत्तर दाखल केले होते. आजही आम्ही उत्तर दाखल केले, असे ठाकरे गटाच्या ( Shiv Sena Thackeray group ) वकीलांनी सांगितले. आम्ही आमच्या राष्ट्रीय कार्यकारिणींची शपथपत्रे सादर केली आहेत. तसेच 2.5 लाखांहून अधिक शपथपत्रे वेळेत सादर केली जातील, असे वकील जैन यांनी स्पष्ट केले.

भारत निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांना त्यांच्या टिप्पण्या संबंधित कागदपत्रांसह आयोगाला 8 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत उत्तर देण्यास सांगितले होते. यानंतर 10-15 लाख प्राथमिक सदस्यत्व फॉर्म देखील सादर केले जातील. शपथपत्रे, इतर गोष्टी सादर करण्यासाठी 4 आठवड्यांचा अवधी मागितला आहे, असेही उद्धव ठाकरे गटाचे प्रतिनिधित्व करणारे वकील सनी जैन यांनी सांगितले.

दरम्यान, शिवसेनेच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर निवडणुक आयोग निर्णय देणार आहे. शिवसेना नेमकी कुणाची यावरुन राज्याच्या राजकारणात संघर्ष सुरु (thackeray vs Shinde Faction SC Hearing Today)आहे. ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे पुरावे सादर करण्यात आले आहे. (Power struggle in Maharashtra) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट बनवल्यानंतर आमदारांवर अपत्रतेची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. हे प्रकरण सुप्रीम कोर्टाने निवडणुक आयोगाकडे वर्ग केले होते. यावर आज सुनावणी सुरु (Political Crisis in Maharashtra) आहे.

शिंदेंचं निवडणूक आयोगाला पत्र -शिवसेनेच्या धनुष्यबाण निवडणूक चिन्हावर दावा करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी, ६ ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे. अर्जात शिंदे यांनी धनुष्यबाण निर्णयाची मागणी केली आहे. शिंदे गटाने अर्जात उद्धव ठाकरे गटाला आमदारांचा पाठिंबा नसल्याचा दावा केला आहे. शिंदे यांनी धनुष्यबाणाच्या वादावर तातडीने सुनावणी करून याचिका निकाली काढण्याची मागणी केली (Shivsena dhanushban) आहे.

आजचा दिवस महत्वाचा -शिवसेनेच्या निवडणूक चिन्हासाठी ठाकरे - शिंदे गटात सुरू असलेल्या लढतीत आजचा 8 ऑक्टोबर हा दिवस दोन अर्थाने महत्त्वाचा आहे. कारण निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षांना कागदपत्रे जमा करण्यास सांगितले असले, तरी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठीही उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही निवडणूक आयोगाने कागदपत्रे सादर करण्यासाठी 7 ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली होती. आता, या कागदपत्रांवर निवडणूक आयोग निर्णय घेणार की, निवडणुकांच्या घोषणेच्या वेळी परिस्थिती लक्षात घेऊन शिवसेना चिन्ह कायम ठेवणार हे पाहावे लागेल. अशा स्थितीत पुढील तीन दिवस महत्त्वाचे ठरणार (Shivsena dhanushban Result Today) आहेत. यापूर्वी जुलैमध्ये शिंदे गटानेही शिवसेनेच्या निवडणूक चिन्ह धनुष बाणावर दावा केला होता. निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात, शिंदे गटाने खरी शिवसेना असल्याचा दावा केला होता. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या मान्यतेचा हवाला दिला होता.

Last Updated : Oct 8, 2022, 6:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details