महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बांगलादेशात पुन्हा शेख हसीना यांचा विजय, पाचव्यांदा होणार पंतप्रधान, मोदींनी केलं अभिनंदन

बांगलादेशमध्ये विद्यमान पंतप्रधान शेख हसीना यांनी पुन्हा एकदा दोन तृतीयांश जागा जिंकत मोठा विजय मिळवलाय. तसेच, त्यांनी यावेळीच्या विजयबरोबर सर्वाधिक काळ बांगलादेशाच्या पंतप्रधान पदावर राहण्याचा विक्रम केला आहे. दरम्यान, हसीना यांच्या या विजानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात.

Etv Bharat
Etv Bharat

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 8, 2024, 11:01 PM IST

नवी दिल्ली : शेख हसीना बांगला देशाच्या पुन्हा एकदा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झालाय. त्यांनी नुकत्याच लागलेल्या निकालानूसार ३०० पैकी दोन तृतीयांश जागा जिंगत विरोधी पार्टीला धूळ चारलीय. त्यांच्या या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेख हसीना त्यांना आपल्या अधिकृत एक्स हँडलवरुन शुभेच्छा दिल्यात. पंतप्रधान म्हणात, पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी संवाद साधला आणि संसदीय निवडणुकीत तब्बल चौथ्यांदा विजय मिळवल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या. आम्ही बांगलादेशासोबत लोककेंद्रित भागीदारी मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहोत. असही मोदी आपल्या संदेशात म्हटलेत.

अनेक नेत्यांना मोठ्या प्रमाणात अटक : शेख हसीना यांनी सर्वाधिक काळ बांगलादेशच्या पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रमही केला आहे. 2009 पासून त्या पंतप्रधान आहेत. शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाला आणि त्यांच्यासोबत असलेल्या घटकपक्षाला 299 जागांपैकी 152 जागा मिळाल्यात. देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि त्यांच्या पक्षासोबत निवडणूक लढत असलेल्या घटक पक्षांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. या निवडणूकीदरम्यान विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना मोठ्या प्रमाणात अटक करण्यात आली होती.

जमात-ए-इस्लामीचा बहिष्कार नाकारला : 2018 मध्ये बांगलादेशात झालेल्या निवडणुकीत विक्रमी 80 टक्के मतदान झाले होते. मात्र, यावेळच्या सार्वत्रिक निवडणुकीवर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता. परिणामी निवडणुकीत केवळ 40 टक्के मतदान झाले. त्याचवेळी अवामी लीगचे सरचिटणीस ओबेदुल कादिर यांनी दावा केला की, लोकांनी मतदानाद्वारे बीएनपी आणि जमात-ए-इस्लामीचा बहिष्कार नाकारला.

समर्थकांसाठी आयर्न लेडी, टीकाकारांसाठी ‘हुकूमशहा’शेख हसीना यांचे समर्थक बांगलादेशातील विकास कामांना गती देण्यासाठी आणि एकेकाळी लष्करशासित देशाला स्थैर्य प्रदान करण्यासाठी ‘आयर्न लेडी’ म्हणून त्यांची प्रशंसा करत असता. तर, त्यांचे टीकाकार आणि विरोधक मात्र त्यांना ‘हुकूमशहा’ नेत्या संबोधतात. अवामी लीग पक्षाच्या प्रमुख शेख हसीना (वय ७६) या जगातील सर्वाधिक काळ काम करणाऱ्या महिला पंतप्रधानांपैकी एक आहेत. बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांच्या कन्या हसीना सन २००९पासून बांगलादेशावर राज्य करीत आहेत. त्याचवेळी नुकत्याच झालेल्या एकतर्फी वादग्रस्त निवडणुकीत त्यांचा विजय सत्तेवरील त्यांची पकड आणखी मजबूत करणार आहे असही बोललं जातय.

ABOUT THE AUTHOR

...view details