नवी दिल्ली : अभिनेते व राजकारणी शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांनी रविवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. (Shatrughan Sinha reaction on Bharat Jodo Yatra). ममता बॅनर्जींच्या तृणमूल मध्ये सामील होण्यापूर्वी कॉंग्रेस पक्षात असलेले 76 वर्षीय शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, 'राहुल गांधींची भारत जोडो यात्रा क्रांतिकारी आहे. त्याचे व्यक्तिमत्व तरुणांसाठी शहाणपणाचे प्रतीक बनले आहे. देशाने यापूर्वी अशी कोणतीही यात्रा पाहिली नाही. त्यांचे ध्येय चांगले आहे आणि मी त्यांना शुभेच्छा देतो'.
Shatrughan Sinha : 'भारत जोडो यात्रा क्रांतिकारी आहे', शत्रुघ्न सिन्हा यांच्याकडून राहुल गांधींचे कौतुक
सिन्हा (Shatrughan Sinha) हे अनेक प्रतिष्ठित चेहऱ्यांपैकी एक आहेत ज्यांनी भारत जोडो यात्रेचे समर्थन केले आहे. (Shatrughan Sinha reaction on Bharat Jodo Yatra). ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला, अभिनेते व राजकारणी कमल हसन हे देखील लाल किल्ल्यावर राहुल गांधींला पाठिंबा दर्शवण्यासाठी सामील झाले होते.
यात्रेला कमल हसन यांचे देखील समर्थन : शत्रुघ्न सिन्हा गेल्या वर्षी बंगालच्या आसनसोल मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. गेल्या वर्षी ते टीएमसीमध्ये दाखल झाले होते. या आधी 2019 मध्ये भाजपला सोडचिठ्ठी देऊन त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पक्ष सोडण्यापूर्वी सिन्हा यांनी पक्षावर जोरदार टीका केली होती. सिन्हा हे अनेक प्रतिष्ठित चेहऱ्यांपैकी आहेत ज्यांनी भारत जोडो यात्रेचे समर्थन केले आहे. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला, अभिनेते व राजकारणी कमल हसन हे देखील लाल किल्ल्यावर राहुल गांधींला पाठिंबा दर्शवण्यासाठी सामील झाले होते. रविवारी माजी लष्करप्रमुख जनरल दीपक कपूर आणि इतर माजी लष्करी अधिकारी गांधींसोबत हरियाणामध्ये मोर्चात दिसले. काँग्रेसचा जनतेशी संबंध पुनरुज्जीवित करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली ही यात्रा या महिन्याच्या अखेरीस जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये संपणार आहे.
यात्रा कधी कुठे पोहचणार? -काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी भारत जोडो यात्रेचे वेळापत्रक शेअर केले आहे. भारत जोडो यात्रा 6 जानेवारीला हरियाणात दाखल झाली. तेथे ती 10 जानेवारीपर्यंत राहील. या नंतर ही यात्रा 11 जानेवारीला पंजाबमध्ये प्रवेश करेल आणि 19 जानेवारीला हिमाचल प्रदेशातून एक दिवसासाठी जाईल. वेणुगोपाल यांच्या म्हणण्यानुसार, 20 जानेवारीला ही यात्रा जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश करेल. त्यानंतर 30 जानेवारीला राहुल गांधी श्रीनगरमध्ये तिरंगा फडकवतील आणि या यात्रेची सांगता होईल.