नागपूर -आज संध्याकाळी शशी थरूर यांचे नागपूरला आगमन होणार आहे. त्यानंतर ते उद्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त सेवाग्राम येथील आश्रमाला भेट देणार आहेत, (Shashi Tharoor will start his campaign) त्यानंतर नागपूरला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. यावेळी ते प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सदस्यांसोबत बैठक घेणार आहेत.
कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लोकशाही पद्धतीने होत आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीत गांधी कुटुंबातील कुणीही नसल्याने निवडणूक ओपन टू ऑल अशी होत आहे. या निवडणुकीच्या रिंगणात मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर अशी थेट लढत होत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 8ऑक्टोबर आहे. तर 17 ऑक्टोबरला पदासाठी निवडणूक होणार आहे. तर मतमोजणी 19 ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळणार आहे. आता 24 वर्षानंतर काँग्रेसला गांधी परिवारातील नसलेला अध्यक्ष मिळणार आहे.