तिरुअनंतपुरम (केरळ): काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांच्या विधानावरून केरळमध्ये राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. थरूर यांनी मुख्यमंत्री पदाबाबत आणखी एक विधान केले. आपण राज्याच्या राजकारणावर लक्ष केंद्रीत करणार असून, वेळ पडल्यास काँग्रेसकडून मुख्यमंत्री होण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. शशी थरूर यांनी असे वक्तव्य केल्याने राज्यातील बहुतांश नेते त्यांच्यावर नाराज आहेत. आपण पुढील लोकसभा निवडणूक लढवणार नसून आता आपले संपूर्ण लक्ष केरळवर असेल, असे थरूर यांनी थेट सांगितले.
तीन- चार वर्षांनी निवडणूक:केरळमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला म्हणाले की, केरळ विधानसभेची पुढील निवडणूक तीन-चार वर्षांनी आहे, अशा परिस्थितीत मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत आताच काही बोलणे योग्य ठरणार नाही. जर कोणी आधीच कोट शिवून घेतला असेल तर तो कोट त्याने दुकानात ठेवला तर बरे होईल, असे म्हणत त्यांनी थरूर यांना टोमणा लगावला. चेन्निथला हे केरळ काँग्रेसचे एक मोठे नेते आहेत.
चालू वर्षात त्यांना पदावर राहू द्या:शशी थरूर म्हणाले की, त्यांनी अलीकडेच मला फोन केला आणि भेटण्याची इच्छा व्यक्त केली म्हणून मी त्यांना भेटलो. थरूर यांच्या विधानावर काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने आधीच स्पष्ट केले की, कोणत्याही खासदाराने त्यांच्या उमेदवारीवर विधान करणे योग्य नाही आणि काँग्रेसकडे उमेदवार निवडण्यासाठी स्वतःची संघटनात्मक यंत्रणा आहे, असेही स्पष्ट केले आहे. 2026 पर्यंत ते थांबतील का, असे विचारले असता, थरूर म्हणाले की, त्यांना चालू वर्षात राहू द्या, नंतर 2024, 2025 आणि नंतर 2026 ला ते माझा विचार करू शकतात.