महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Shardiya Navratri 2022: कधीपासून सुरू होतेय शारदीय नवरात्री?, जाणून घ्या घटस्थापनेची वेळ अन् मुहूर्त - Navratri 2022

हिंदू धर्मात नवरात्रीला ( Shardiya Navratri ) खूप महत्त्व आहे. शारदीय नवरात्रीचा उत्सव ( Sharadiya Navratri festival 2022 ) जवळ आला आहे. हा उत्सव दुर्गा देवीला समर्पित आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवी शक्तीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. यावेळी सोमवार, २६ सप्टेंबर २०२२ पासून शारदीय नवरात्रीउत्साहाला सुरुवात होत आहे. शारदीय नवरात्रौत्सवाची सांगता ४ ऑक्टोबरला होणार आहे. (Ghatsthapana Timings Shubh Muhurat Puja Time )

Shardiya Navratri
नवरात्री

By

Published : Sep 5, 2022, 11:57 AM IST

Updated : Sep 14, 2022, 1:52 PM IST

हिंदू धर्मात नवरात्रीला खूप महत्त्व आहे. ( Sharadiya Navratri festival 2022 ) वर्षभरात एकूण चार नवरात्र असल्या तरी चैत्र आणि शारदीय नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की या काळात दुर्गा देवी भक्तांचे सर्व त्रास दूर करते आणि इच्छित फळ देते. भारतातील सर्व राज्यांमध्ये नवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशाची स्थापना केली जाते. अशा स्थितीत नवरात्रीच्या पहिल्या दिवसाला घटस्थापना ( Ghatsthapana ) असेही म्हणतात. चला तर मग जाणून घेऊया शारदीय नवरात्रीची ( Shardiya Navratri ) ही वेळ,मुहूर्त ( Ghatsthapana Timings Shubh Muhurat Puja Time ) काय आहे.

शारदीय नवरात्री 2022

शारदीय नवरात्री 2022 घटस्थापना मुहूर्त ( Shardiya Navratri 2022 Muhurat )-शारदीय नवरात्री २६ सप्टेंबरपासून सुरू होणार असून ४ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. प्रतिपदा तिथी २६ सप्टेंबरच्या पहाटे ३.२४ ते २७ सप्टेंबरच्या पहाटे ३.०८ पर्यंत असेल. दरम्यान, घटस्थापना मुहूर्त २६ सप्टेंबर रोजी सकाळी ६.२० ते १०.१९ पर्यंत असेल. दुसरीकडे, अभिजित मुहूर्त २६ सप्टेंबर रोजी सकाळी ११.५४ ते दुपारी १२.४२ पर्यंत असणार आहे.

नवरात्रीच्या नऊ रूपांची पूजा?

  • २६ सप्टेंबर २०२२ - प्रतिपदा तिथी - शैलपुत्री पूजा आणि घटस्थापना
  • २७ सप्टेंबर २०२२ - द्वितीया तिथी - ब्रह्मचारिणी पूजा
  • २८ सप्टेंबर २०२२ - तृतीया तिथी - चंद्रघंटा पूजा
  • २९ सप्टेंबर २०२२ - चतुर्थी तिथी - कुष्मांडा पूजा
  • ३० सप्टेंबर २०२२ - पंचमी तिथी - स्कंदमाता पूजा
  • १ ऑक्टोंबर २०२२ - षष्ठी तिथी - कात्यायनी पूजा
  • २ ऑक्टोंबर २०२२ - सप्तमी तिथी - कालरात्री पूजा
  • ३ ऑक्टोंबर २०२२ - अष्टमी तिथी - महागौपूजा, दुर्गा महाष्टमी
  • ४ ऑक्टोंबर २०२२ - नवमी तिथी - सिद्धरात्री पूजा, दुर्गा महानवमी पूजा

जाणून घ्यापूजा पद्धत (Navratri Puja Method ) -सर्वप्रथम मातीचे भांडे घ्या. त्यात तीन थरांमध्ये माती घाला आणि 9 प्रकारचे धान्य मातीत टाका आणि त्यात थोडे पाणी घाला. आता एक कलश घ्या. त्यावर स्वस्तिक बनवा. मग कलावा बांधून ठेवा. यानंतर कलश गंगाजल आणि स्वच्छ पाण्याने भरा. त्यात एक पूर्ण सुपारी, फुलं आणि दुर्वा घाला. तसेच अत्तर, पंचरत्न आणि नाणे देखील टाका. कलशाच्या आत आंब्याची पाने लावा. कलशच्या झाकणावर तांदूळ ठेवा. देवीचे स्मरण करताना कलशाचे झाकण लावा. आता एक नारळ घ्या आणि त्यावर कलवा बांधा. कलशवर स्वस्तिक चिन्ह बनवा. कुंकवाने नारळावर टिळक लावा आणि नारळ कलशावर ठेवा. कलशावर नारळासोबत तुम्ही काही फुलेही ठेवू शकता. दुर्गा देवीच्या स्वागतासाठी हा कलश मंदिरात स्थापन करा.

हेही वाचा:Jyeshtha Gauri Pujan : साताऱ्यात पवार कुटुंबीयांनी साकारले गौराईसमोर 'अष्टविनायक देखावा'

Last Updated : Sep 14, 2022, 1:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details