नवी दिल्ली : श्रद्धा हत्याकांडातील ( Shraddha Walker murder case ) आरोपी आफताबची नार्को ( ( Aftab narco test ) ) चाचणी पूर्ण झाली आहे. सागर प्रीत हुडा, विशेष सीपी (कायदा व सुव्यवस्था), दिल्ली पोलिस यांनी ही माहिती दिली आहे. यानंतर या चाचणीचे विश्लेषण करण्यात येईल. तसेच त्यानुसार पुढील तपासाची दिशा ठरणार आहे. श्रद्धा खून प्रकरणात FSL टीम आणि आंबेडकर हॉस्पिटलच्या टीमने आफताब पूनावाला याची नार्को टेस्ट केली. ही चाचणी 2 तासांपेक्षा जास्त चालली. टीममध्ये फॉरेन्सिक लॅब रोहिणीचे मानसशास्त्रज्ञ, फोटो तज्ज्ञ आणि आंबेडकर हॉस्पिटलचे डॉक्टर होते. एस गुप्ता सहायक संचालक, फॉरेन्सिक सायन्स लॅब, रोहिणी, यांनी ही माहिती दिली.
श्रद्धा हत्याकांड : आरोपी आफताबची नार्को चाचणी पूर्ण - Shraddha Walker murder case
श्रद्धा हत्याकांडातील ( Shraddha Walker murder case ) आरोपी आफताबची नार्को चाचणी पूर्ण ( Aftab narco test ) झाली आहे. सागर प्रीत हुडा, विशेष सीपी (कायदा व सुव्यवस्था), दिल्ली पोलिस यांनी ही माहिती दिली आहे. यानंतर या चाचणीचे विश्लेषण करण्यात येईल. तसेच त्यानुसार पुढील तपासाची दिशा ठरणार आहे.
आफताबची नार्को चाचणी सुमारे 2 तास -मेहरौली येथील श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब अमील पूनावाला याची गुरुवारी दिल्लीतील रोहिणी येथील आंबेडकर रुग्णालयात नार्को चाचणी करण्यात आली. डॉक्टरांच्या मतानुसार त्याला २ ते ३ दिवस निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर नार्को चाचणीसाठी एफएसएल रोहिणी येथे आणले जाईल. आंबेडकर रुग्णालयातील भूल विभागाचे डॉ.नवीन यांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबची नार्को चाचणी सुमारे 2 तास चालली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी तेथे एक न्यायदंडाधिकारीही उपस्थित होते. आरोपीची प्रकृती ठीक असून, त्याला तातडीने रुग्णालयातून सोडण्यात आले. यानंतर दिल्ली पोलीस आफताबला घेऊन तिहार तुरुंगात पोहोचले आहे.
बहुतांश प्रश्नांची समाधानकारक उत्तरे -आंबेडकर रुग्णालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताब पूनावाला यांनी नार्को चाचणीदरम्यान विचारलेल्या बहुतांश प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली आहे. त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे इंग्रजीत दिली. काही प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आफताबने थोडा वेळ मागीतला होता. चाचणीदरम्यान आफताब अनेक प्रश्नांवर शांत होता मात्र, त्याला पुन्हा प्रश्न विचारल्यावर त्याने उत्तर दिले.