नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक 2024 च्या तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणूक 2024 च्या तयारीसाठी राष्ट्रवादीच्या विविध नेत्यांच्या खांद्यावर शरद पवार यांनी जबाबदारी टाकण्यास सुरुवात केली आहे. शरद पवार यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली आहे. कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे यांची निवड केल्यामुळे अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा असल्याबाबत शरद पवार यांना विचारले. अजित पवार हे नाराज नसल्याचेही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
सुप्रिया सुळे यांच्याकडे कामाचा मोठा अनुभव :सुप्रिया सुळे यांना लोकसभेत काम करण्याचा मोठा अनुभव आहे. त्यांच्याकडे राजस्थान, हरियाणा यासह देशाच्या विविध राज्यात काम करण्याचा मोठा अनुभव आहे. त्यासह प्रफुल्ल पटेल यांच्याकडे छत्तीसगडसह महाराष्ट्राच्या इतर भागात काम करण्याचा अनुभव आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांकडे कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आल्याचे शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.