महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Sharad Pawar Meeting : शरद पवारांनी घेतली खरगे, राहुल गांधींची भेट, INDIA आघाडीच्या रणनीतीवर चर्चा - राहुल गांधी

Sharad Pawar Meeting : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. खरगे यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी या तिन्ही नेत्यांची बैठक झाली.

Sharad Pawar
Sharad Pawar

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 6, 2023, 6:28 PM IST

नवी दिल्ली Sharad Pawar Meeting : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. या वेळी विरोधी पक्षांच्या आघाडीची भविष्यातील रूपरेषा आणि रणनीती यावर चर्चा करण्यात आली. खरगे यांच्या निवासस्थानी तिन्ही नेत्यांची बैठक झाली. या बेठकीला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेस कार्यकारिणी सदस्य गुरदीप सप्पलही उपस्थित होते.

मल्लिकार्जुन खरगे यांची पोस्ट : बैठकीनंतर कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी 'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फोटो शेअर करत बैठकीची माहिती दिली. 'देशातील जनतेचा आवाज आणखी बुलंद करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राहुल गांधी यांची भेट घेतली. आम्ही प्रत्येक आव्हानासाठी तयार आहोत. इंडियाच जिंकेल, असं ते म्हणाले. शरद पवार 'X' वर पोस्ट करत म्हणाले, 'काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट झाली. या बैठकीला राहुल गांधी, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेस कार्यकारिणी सदस्य गुरदीप सप्पल उपस्थित होते'.

विरोधी पक्षांची 'इंडिया' आघाडी : या बैठकीत इंडिया आघाडीची पुढील रणनीती, रूपरेषा आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. या महिन्यात भोपाळ येथे होणारी विरोधकांची जाहीर सभा रद्द करण्यात आली असून, इंडिया आघाडीची पुढील बैठक कुठे होणार हे अद्याप निश्चित नाही. पुढील लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) सामना करण्यासाठी दोन डझनहून अधिक विरोधी पक्षांनी 'इंडिया' आघाडी तयार केली आहे.

१४ सदस्यीय समन्वय समितीची स्थापना : 'इंडिया'मधील घटक पक्षांच्या नेत्यांच्या नुकत्याच मुंबईत झालेल्या बैठकीत युतीच्या भविष्यातील कार्यक्रमांची रूपरेषा तयार करण्यासाठी १४ सदस्यीय समन्वय समितीची स्थापना करण्यात आली. ही समन्वय समिती विरोधी आघाडीची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था म्हणून काम करेल. या वर्षी जूनमध्ये पाटणा येथे झालेल्या विरोधी गटाच्या पहिल्या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक जागेवरून सर्वात मजबूत उमेदवार निवडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तर मुंबईत झालेल्या विरोधी आघाडीच्या तिसर्‍या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या ठरावात, पक्ष शक्य तितक्या एकजुटीनं निवडणुका लढवतील. तसंच विविध राज्यांतील जागा वाटपाचं काम तातडीनं सुरू होईल, असं म्हटलं होतं.

हेही वाचा :

  1. MP Praful Patel : शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात जाण्यावर प्रफुल पटेल म्हणाले...
  2. Uddhav Thackeray On Eknath Shinde : 'आज अजित पवार त्यांच्या उरावर...', उद्धव ठाकरेंची जोरदार टोलेबाजी

ABOUT THE AUTHOR

...view details