नवी दिल्ली -राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नुकतीच भेट घेतली आहे. पवार यांच्यासोबत खासदार सुनील तटकरे आणि राष्ट्रीय साखर सहकारी संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेकर होते. केंद्रीय गृहमंत्रालयाची जबाबदारी असलेल्या अमित शाहंकडे सहकार मंत्रालयाची जबाबदारी आली आहे. त्यामुळे शरद पवारांनी सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन केल्याची माहिती पवारांनी ट्विटरवरून दिली.
एमएसपी आणि इथेनॉल उत्पादन युनिटची मागणी -
ऊसाला मिळणारा हमीभाव हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. शरद पवारांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने घेतलेल्या या भेटीत दोन मुख्य मागण्या करण्यात आल्या. ऊसाचा हमीभाव आणि साखर कारखान्याच्या आवारात इथेनॉल उत्पादनाच्या युनीटला परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच या मागण्या अमित शाह मान्य करतील असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे.